स्मार्ट पुण्यासाठी ‘एडीबी’ देणार

By Admin | Updated: August 6, 2015 03:19 IST2015-08-06T03:19:02+5:302015-08-06T03:19:02+5:30

केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेच्या प्रवेशाच्या उंबरठ्यावर असलेल्या पुणे

Smart Puling 'ADB' | स्मार्ट पुण्यासाठी ‘एडीबी’ देणार

स्मार्ट पुण्यासाठी ‘एडीबी’ देणार

पुणे : केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेच्या प्रवेशाच्या उंबरठ्यावर असलेल्या पुणे महापालिकेस एडीबी (एशियन डेव्हलपमेंट बँक) तांत्रिक सल्लागार पुरविण्याची तयारी दर्शविली आहे. त्यासाठी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी मंगळवारी (दि. ४) मुंबई येथे बँकेच्या प्रतिनिधींची भेट घेतली.
या बँकेच्या माध्यमातून महापालिकेस स्मार्ट सिटीसाठी प्रकल्प अहवाल तयार करण्यास मोठी मदत होणार असल्याचे कुमार यांनी सांगितले. यापूर्वी महापालिकेने शहरातील प्रकल्पांसाठी जागतिक बँकेसही निधीसाठी सादरीकरण केलेले आहे.
केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेसाठी राज्य शासनाने पुणे महापालिकेची शिफारस केलेली आहे. त्यानुसार, केंद्राकडून पहिल्या २० शहरांमध्ये पुणे शहराची निवड झाल्यास महापालिकेस पुढील तीन महिन्यांत शहरासाठीचे प्रकल्प सादर करावयाचे आहेत. त्यासाठी केंद्राकडून सल्लागारांची यादी जाहीर करण्यात येणार असली तरी, महापालिकेस आपले सल्लागार नेमता येणार आहेत.
त्याअनुषंगाने महापालिकेकडून एडीबीच्या अधिकाऱ्यांशी प्राथमिक चर्चा करण्यात आली असून बँकेने सल्लागार पुरविण्याची तयारी दर्शविली असल्याची माहिती कुमार यांनी दिली. याशिवाय या योजनेअंतर्गत महापालिकेस पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपअंतर्गत निधीची उपलब्धता करून घ्यावी
लागणार आहे. त्यासाठीही या बँकेची मदत होणार असल्याचे कुमार
यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

Web Title: Smart Puling 'ADB'