शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

‘स्मार्ट’मध्ये विकासकामांकडे दुर्लक्ष!

By admin | Updated: September 23, 2015 03:43 IST

केंद्र शासनाकडून जाहीर होणाऱ्या स्मार्ट सिटीच्या पहिल्या टप्प्यात समावेश व्हावा याकरिता महापालिकेकडून जोरदार प्रयत्न करण्यात येत असतानाच स्मार्ट अभियान चालविताना शहरातील अनेक विकासकामे रखडत आहेत

पुणे : केंद्र शासनाकडून जाहीर होणाऱ्या स्मार्ट सिटीच्या पहिल्या टप्प्यात समावेश व्हावा याकरिता महापालिकेकडून जोरदार प्रयत्न करण्यात येत असतानाच स्मार्ट अभियान चालविताना शहरातील अनेक विकासकामे रखडत आहेत, याकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका, अशा शब्दांमध्ये महापौर दत्तात्रय धनकवडे, सभागृहनेते बंडू केमसे, स्थायी समितीच्या अध्यक्ष अश्विनी कदम यांनी आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे नाराजी व्यक्त केली.राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षा खासदार वंदना चव्हाण यांनी महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कुणाल कुमार यांच्यासमवेत सोमवारी बैठक घेतली. नदीसुरक्षा, स्वच्छता, कचरा प्रश्न आणि इतर नागरी प्रश्न रखडत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. जानेवारी २०१५मध्ये प्रशासनाने स्वच्छतागृहांची स्वच्छताविषयक कामे मे महिन्यापर्यंत पूर्ण होईल, असे सांगितले होते. त्यावर कार्यवाही झाली नाही. नदीपात्रात अतिक्रमण, राडारोडा टाकणे थांबलेले नाही. त्यामुळे त्याकरिता सुरक्षारक्षक नेमण्यात यावेत. शहर कंटेनर मुक्त करताना प्रशासनाने कंटेनर हलविले आहेत. मात्र, कचऱ्याची पर्यायी व्यवस्था केली नाही. २१ प्रभागांत शून्य कचरा प्रकल्प राबविताना उर्वरित सर्व प्रभागांतील कचऱ्याचे काय, या बाबतचेही धोरण प्रशासनाने निश्चित केले पाहिजे. सार्वजनिक भिंतीवर पोस्टर्स लावून शहर विद्रूप केले जात आहे, त्यांच्यावर काहीच कारवाई केली जात नाही, अशी तक्रार चव्हाण यांनी केली. पर्यटन वाढण्यासाठी पालिकेने स्वतंत्र अधिकारी नियुक्त केला पाहिजे. मात्र, अनेक विभाग त्यावर स्वतंत्रपणे काम करीत आहेत अशीही सूचना या बैठकीमध्ये करण्यात आली.याबाबत कुणाल कुमार म्हणाले, ‘‘सार्वजनिक स्वच्छतागृहांची १५ मशिन गाड्यांद्वारे दररोज यांत्रिक पद्धतीने स्वच्छता करण्यात येणार आहे, ही स्वच्छता दोन शिफ्ट्समध्ये केली जाईल. यासाठी स्वच्छता समिती स्थापन केली जाईल.’’ कचरासमस्यावर उपाय म्हणून प्रभाग अधिकाऱ्यांमध्ये स्पर्धा घेण्यात यावी, जेणेकरून कचरा साचण्यावर प्रतिबंध येतील, ही सूचना आयुक्तांनी मान्य केली.