शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

राजगडावर दिसली ‘निमास्पिस’ प्रजातीमधील सर्वात लहान पाल; गडाच्या नावाने नामकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 03:21 IST

पुण्याच्या वन्यजीव संशोधकाचा सहभाग, दगडांच्या कपारीत तिचा अधिवास आहे. ही पाल दिसल्यावर तिच्या आकारशास्त्र, गुणसूत्रांच्या अभ्यासानंतर ती प्रदेशनिष्ठ असल्याचे समोर आले.

पुणे : पश्चिम घाटातील महत्त्वाचा किल्ला असणाऱ्या राजगडावर पालीच्या नव्या प्रजातीचा शोध लागला आहे. ‘निमास्पिस’ वर्गातील या पालीचे नामकरण ‘निमास्पिस राजगडएन्सिस’ असे केले आहे. ही प्रदेशनिष्ठ पाल असून, ती जगात इतर कुठेही आढळत नसल्याचे पुण्यातील वन्यजीव संशोधक अनिस परदेशी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ही प्रजाती ‘युनिक’ असून, तिचा अधिवास जपला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

या पालीचा शोध वन्यजीव संशोधक अनिस परदेशी, अमित सय्यद, विवेक फिलिप सिरियॅक आणि शौरी सुलाखे या संशोधकांनी लावला आहे. या पालीचा शोध मागील वर्षी २७ सप्टेंबर मध्ये लागला. त्यानंतर त्याविषयी जगभरात कुठे माहिती आहे का, त्यावर संशोधन झाले. वर्षभर त्याविषयी संशोधन केल्यावर आता ‘इव्होल्यूशनरी सिस्टीमॅटिक्स’ संशोधनपत्रिकेत त्याची माहिती प्रसिद्ध झाली आहे. अनिस आणि त्याच्या टीमला राजगडाच्या पाली दरवाजाच्या दगडांमध्ये ही पाल दिसली. 

दगडांच्या कपारीत तिचा अधिवास आहे. ही पाल दिसल्यावर तिच्या आकारशास्त्र, गुणसूत्रांच्या अभ्यासानंतर ती प्रदेशनिष्ठ असल्याचे समोर आले. या पालीचा आकार २७ मिलीमीटर असून, हा या कुळातील सर्वात कमी असल्याचे अनिस यांनी सांगितले. ‘निमास्पिस’या कुळातील पालींना ‘ड्वार्फ गेको’ असे म्हटले जाते.

‘निमास्पिस’ कुळाच्या ५० प्रजाती‘निमास्पिस’ कुळातील ५० प्रजातींची नोंद भारतात असून, त्यातील पाली पश्चिम घाट, पूर्व घाटातील काही भाग, आसाम, अंदमान, निकोबार बेटांवरही या कुळातील पाली दिसतात. पण ‘निमास्पिस राजगडएन्सिस’ ही फक्त राजगडावरच दिसते. यांचे खाद्य कीटक आहे.