चारित्र्यावर संशय घेत पत्नीचा चिरला गळा; पुण्यातील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 18:05 IST2022-11-18T18:04:23+5:302022-11-18T18:05:02+5:30
धारधार लोखंडी कटरने गळ्यावर वार...

चारित्र्यावर संशय घेत पत्नीचा चिरला गळा; पुण्यातील धक्कादायक घटना
पुणे : ‘तू माेबाइलवर चांगले स्टेेट्स ठेवत असतेेस’ असे बाेलत चारित्र्यावर संशयातून विभक्त राहणाऱ्या पत्नीचा कटरने गळा चिरून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना वडगाव शेरी भाजीमंडई परिसरात बुधवारी रात्री घडली. या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली.
याप्रकरणी चंदननगर पाेलिसांनी आराेपी पती शिवशंकर शवरप्पा मेनसे (वय ३०, रा. कुमठे, ता. उत्तर सोलापूर) याला अटक केली आहे. याबाबत यल्लवा मेनसे (वय ३०, रा. वडगाव शेरी) यांनी फिर्याद दिली.
फिर्यादी महिला व आरोपी हे दोघे पती पत्नी आहेत. शिवशंकर हा चालक म्हणून, तर त्याची पत्नी हाउसकिपिंगचे काम करते. शिवशंकर याचे दुसऱ्या महिलेसोबत प्रेमसंबंध असून, त्याला दारूचे व्यसन असल्याने त्या तीन वर्षांपासून त्याच्यापासून वेगळ्या राहतात. दरम्यान शिवशंकर याने पत्नीला बुधवारी जेवणाचा डब्बा घेऊन वडगावशेरी भाजी मंडई परिसरात बोलावले होते. तेथे तो त्याची मिनी बस घेऊन थांबला होता. बोलण्याच्या बहाण्याने त्याने पत्नीला गाडीत बोलावले. त्यानंतर धारधार लोखंडी कटरने गळ्यावर वार केला. प्रसंगावधान राखत पत्नीने चालत्या गाडीतून उडी मारली.