शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
3
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
4
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
5
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
6
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
7
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
8
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
9
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
10
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
11
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
12
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
13
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
14
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
15
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
16
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
17
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
18
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
19
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
20
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी

आकाशी निळे झेंडे, हाती मशाल, मुखी ‘जय भीम’चा नारा; कोरेगाव भीमा येथे लाखोंचा जनसागर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 18:30 IST

कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी राज्यासह देशभरातून लाखो अनुयायी कोरेगाव भीमा येथे आले होते

कोरेगाव भिमा : कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी आलेल्या लाखोंच्या जनसमुदायाच्या मुखात ‘जय भीम-जय भीम’ चा नारा होता. तरुणवर्ग हातामध्ये निळे झेंडे घेत जोरदार घोषणाबाजी करीत होते. आज लाखोंचा जनसमुदाय मानवंदना व अभिवादन करण्यासाठी येत असताना जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणा यांच्या नियोजनामुळे शौर्यदिन मानवंदना कार्यक्रम शांततेत पार पडला.      केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, खासदार सुनेत्रा पवार, क्रिडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, समाजकल्याण राज्यमंत्री माधुरी मिसाळ, माजी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले, आमदार ज्ञानेश्वर कटके, बापुसाहेब पठारे, संजय बनसोडे, नितीन राऊत, राजकुमार बडोले वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, रिपब्लीकन पिपल पार्टि जोगेंद्र कावडे, बामसेफचे वामन मेश्राम,  भीमराज आंबेडकर, भीम आमीर्चे संस्थापक चंद्रशेखर आझाद, शिवसेना नेत्या सुषमा अंधारे, माजी आमदार प्रकाश गजभिये, यांसह अनेक आदींनी सदर ठिकाणी अभिवादन केले. राज्यभरासह उत्तर प्रदेश , मध्यप्रदेश , गुजरात , तेलंगना, हरियाना , कर्नाटकसह यावर्षी परदेशातुनही मोठ्या प्रमाणावर आंबेडकरी समाज विजयस्तंभाजवळ एकवटला होता. या नागरिकांमध्ये उत्साह भरण्याचे काम जागोजागी शाहिरी जलशाच्या माध्यमातुन केले जात होते. भारत मुक्ती मोर्चा, रिपब्लिकन सेना, आरपीआय, भारतीय बौध्द महासभा, दलीत पँथर, यासह अनेक सामाजिक संघटनांच्या वतीने मानवंदना देण्यात येत असताना आंबेडकरी चळवळीची आणि सामाजिक विषमतेवर सडेतोड भाष्य करणारी गित याठिकाणी साजरी केली जात होती. या सोबतच मराठवाडा, विदर्भातुन आलेले कलाकार रस्त्याच्या कडेला, झाडाखाली सावलीत बसून प्रभोधनात्मक गाणी सादर करत होते.

विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी गर्दीचा उच्चांक       कोरेगाव भीमा येथे मंगळवार रात्रीपासून सुरु असलेला गर्दीचा ओघ बुधवारी पहाटेपासूनच वाढायला सुरुवात झाली होती. अंदाजे १४ ते १५ लाख लोक अभिवादनासाठी याठिकाणी आले होते. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ६३० बस सोडल्याने विजयस्तंभास मानवंदना येथे येणा-या नागरिकांची सोय झाली.    महार रेजिमेंटची सलामी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर १९२७ साली विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी आल्यानंतर त्यांनी महार रेजीमेंटची स्थापना करण्याची मागणी स्तंभावरुनच केली होती. या घटनेच्या कृतज्ञता म्हणूण दरवर्षी १ जानेवारीला विजयस्तंभास महार रेजीमेंटच्या निवृत्त जवानांच्यावतीने मानवंदना देण्यात येत असते. यावर्षी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या उपस्थितीत दिलेली मानवंदना विशेष आकर्षण ठरले. 

नागरिकांच्या तक्रारीसाठी नियंत्रण कक्ष

कोरेगाव भीमा व विजयस्तंभाजवळ पोलीस नियंत्रण कक्ष उभारल्यामुळे गर्दित हरवले-सापडले यासाठी चांगला उपयोग होत होता.अनेक लहान मुले , मोबाईल , पाकिट सापडलेली या कक्षात पोलीस ज्यांचे आहेत त्यांना देत होती. तसेच समता सैनिक दलाचे २ हजार जवान देखील पोलीसांना मदत करत असतानाच पोलीसांच्या मदतीला असलेले शांतीदुत देखील गर्दिला दिशादर्शक व मदत करण्यास उपयोगी पडत होते.

एनडीआरएफचे जवान तैनात

कोरेगाव भीमा येथिल पुणे-नगर महामार्गावरील दुतर्फा असलेल्या पुलावर मोठी गर्दि झाल्याने कोणताही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी एनडीआरएफचे जवान तैणात करण्यात आले असुन ते सतत भीमा नदीपात्रातून आपल्या पाणीबुडीतुन लक्ष ठेवण्यात आले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरSocialसामाजिकPoliceपोलिस