पिस्तुल बाळगणाऱ्या तरुणाला सिंहगड पोलिसांनी केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 22:37 IST2019-06-20T22:35:15+5:302019-06-20T22:37:29+5:30
सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील मार्शल पोलीस शिपाई शैलेश नेहरकर व लक्ष्मण काशिद यांना मिळालेल्या माहितीवरुन हिंगणे खुर्द येथे पिस्तुल बाळगणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली़.

पिस्तुल बाळगणाऱ्या तरुणाला सिंहगड पोलिसांनी केली अटक
पुणे : सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील मार्शल पोलीस शिपाई शैलेश नेहरकर व लक्ष्मण काशिद यांना मिळालेल्या माहितीवरुन हिंगणे खुर्द येथे पिस्तुल बाळगणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली़.
रोहित ऊर्फ किट्या दत्ता जाधव (वय १९, रा़ महादेवनगर, हिंगणे खुर्द) असे त्याचे नाव आहे़. त्याच्याकडून एक पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, पोलीस शिपाई शैलेश नेहरकर, लक्ष्मण काशिद हे आनंदनगर भागात १८ जूनला गस्त घालत होते़. त्यावेळी एक तरुण हिंगणे खुर्द येथील बसला असून त्याच्या कमरेला पिस्तुल लावलेले दिसत असल्याची माहिती मिळाली़. त्यानुसार वरिष्ठांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक बी़ डी़ साळुंखे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तेथे जाऊन पाहणी केली असता पोलिसांना पहाताच तो पळून जाऊ लागला़. तेव्हा पोलिसांनी पाठलाग करुन पकडून दिले़. विना परवाना शस्त्र बाळगल्याबद्दल त्याच्यावर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे़. त्याने हे पिस्तुल कोठून आणले याचा तपास करण्यात येत आहे़.