शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

सिंहगड किल्ला ५ जूनपासून पर्यटकांना खुला; शिवराज्याभिषेक दिनी नागरिकांना गडावर जाता येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 12:00 IST

सिंहगड बंद असताना वनविभागाने या काळात गडावरील टपरी, हॉटेल, घर आदींसह बेकायदा बांधकामांवर कारवाई केली

पुणे: अतिक्रमण कारवाईसाठी मागील आठवड्यापासून पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आलेला सिंहगड किल्ला उद्या (गुरुवार)पासून खुला करण्यात येणार असल्याची माहिती हवेलीचे प्रांताधिकारी यशवंत माने यांनी दिली. अतिक्रमणविरोधी कारवाईसह धोकादायक दरडी काढण्याचे हे काम पूर्ण होत आले असून येत्या शिवराज्यभिषेकाच्या पूर्वसंध्येला पर्यटकांसाठी सिंहगड किल्ला खुला राहील, असेही त्यांनी सांगितले.

सिंहगड किल्ल्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले होते. येथे आरसीसी, दगडी बांधकाम करण्यात आले होते तसेच पावसाळ्यात सिंहगड किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर काही ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता होती. त्यामुळे अतिक्रमण व दरडी हटविण्याचे काम करताना रस्ता मोकळा मिळावा, तसेच कोणत्याही पर्यटकांना इजा होऊ नये, यासाठी २९ मेपासून पर्यटकांना सिंहगडावर जाण्यास बंदी केली होती. वनविभागाने या काळात गडावरील टपरी, हॉटेल, घर आदींसह बेकायदा बांधकामांवर कारवाई केली. जवळपास २० हजार स्क्वेअर फूट बेकायदा बांधकामे पाडण्यात आली.

याबाबत प्रांताधिकारी यशंवत माने म्हणाले, ‘पर्यटकांना इजा होऊ नये अथवा कारवाईत अडथळा येऊ नये, म्हणून गडावर प्रवेश बंद ठेवण्यात आला होता. आता सर्व काम झाले आहे. पाडण्यात आलेला राडारोडा उचलण्याचे काम बुधवारी पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर ५ जूनपासून पर्यटकांना सिंहगडावर प्रवेश देण्यात येणार आहे. ६ जूनला शिवराज्याभिषेक दिनी नागरिकांना गडावर येता यावे, यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.’

टॅग्स :Puneपुणेsinhagad fortसिंहगड किल्लाShivrajyabhishekशिवराज्याभिषेकtourismपर्यटनTrekkingट्रेकिंगShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज