गायक सिद्धु मुसेवाला कांडमधील शार्पशुटर संतोष जाधवच्या नावाने खंडणीची धमकी

By विवेक भुसे | Updated: November 5, 2023 11:57 IST2023-11-05T11:49:54+5:302023-11-05T11:57:12+5:30

तुझ्या घरच्यांना बायका पोरांना मारेन, तुला दिवाळी साजरी करायची असेल तर आता ५० हजार दे, अशी धमकी दिली

Singer Sidhu Museva threatened with extortion in the name of sharpshooter Santosh Jadhav in the scandal | गायक सिद्धु मुसेवाला कांडमधील शार्पशुटर संतोष जाधवच्या नावाने खंडणीची धमकी

गायक सिद्धु मुसेवाला कांडमधील शार्पशुटर संतोष जाधवच्या नावाने खंडणीची धमकी

पुणे: गायक सिद्धु मुसेवाला हत्या प्रकरणातील शॉर्प शुटर संतोष जाधव याच्या नावाने एका व्यावसायिकाला फोन करुन त्यांच्याकडे खंडणी मागण्याचा प्रकार समोर आला आहे. पंजाबी गायक सिद्धु मुसेवाला यांची कॅनडातील गॅगस्टरने हत्या केली होती. त्यासाठी पुणे जिल्ह्यातील शॉर्प शुटर संतोष जाधव व त्याच्या साथीदाराला सुपारी देण्यात आली होती. ग्रामीण पोलिसांनी संतोष जाधव याला गुजरातमधून अटक केली होती. देशभर हे प्रकरण खूप गाजले होते.

याबाबत कोथरुड येथील एका ३४ वर्षाच्या व्यवसायिकाने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या व्यावसायिकांचा खोदकामासाठी लागणार्‍या जेसीबी पुरविण्याचा व्यवसाय आहे. ते गेले काही दिवस आजारी आहेत. हे घरी असताना त्यांना शनिवारी सायंकाळी एक फोन आला. फोन करणार्‍याने सिद्धु मुसेवाला कांड ऐकला आहे का, मी संतोष जाधव बोलत आहे. तुझ्या नावाची १५ लाखांची सुपारी मिळाली आहे. तुझा जीव हवा असेल तर तू किती देतोस बोल पैसे नाही दिले तर गोळ्या घालीन' अशी धमकी देऊन विशीगाळ केली. तुझ्या घरच्यांना बायका पोरांना मारेन, तुला दिवाळी साजरी करायची असेल तर आता ५० हजार दे असे म्हणून पुन्हा धमकी दिली. या व्यावसायिकाने तातडीने पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दिली. संतोष जाधव हा सध्या ग्रामीण पोलिसांनी दाखल केलेल्या मोक्का गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत आहेत.

Web Title: Singer Sidhu Museva threatened with extortion in the name of sharpshooter Santosh Jadhav in the scandal