येत्या रविवारी १४२ गडकिल्ल्यांवर एकाच वेळी दुर्गपूजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:11 IST2021-02-27T04:11:26+5:302021-02-27T04:11:26+5:30

किल्ले संवर्धन कार्यात अग्रेसर असणाऱ्या शिवाजी ट्रेल या संस्थेच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी देशभरातील १४० व विदेशातील २ अशा ...

Simultaneous Durga Puja on 142 forts this coming Sunday | येत्या रविवारी १४२ गडकिल्ल्यांवर एकाच वेळी दुर्गपूजा

येत्या रविवारी १४२ गडकिल्ल्यांवर एकाच वेळी दुर्गपूजा

किल्ले संवर्धन कार्यात अग्रेसर असणाऱ्या शिवाजी ट्रेल या संस्थेच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी देशभरातील १४० व विदेशातील २ अशा १४२ गड-किल्ल्यांवर रविवार दि. २८ रोजी सकाळी ९ वाजता एकाच वेळी दुर्गपूजा केली जाणार आहे. या दुर्गपूजा सोहळ्यात विविध गड-किल्ल्यांवर शिवकालीन सरदार घराण्यांचे वंशज उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती शिवाजी ट्रेलचे अध्यक्ष मिलिंद क्षीरसागर यांनी दिली.

सर्वसामान्यांमध्ये गडकिल्ल्यांबाबत गोडी निर्माण व्हावी, जनजागृती व्हावी व त्यातून गडकिल्ले संवर्धन मोहिमेला बळकटी मिळावी, या उद्देशाने शिवाजी ट्रेल संस्थेच्या वतीने दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या रविवारी विविध किल्ल्यांवर दुर्गपूजा सोहळ्याचे आयोजन केले जाते. शिवाजी ट्रेलचे दुर्गपूजेचे हे २५ वे वर्ष असून दरवर्षी उत्साहात होणारी ही दुर्गपूजा या वर्षी मात्र कोरोनाच्या संकटामुळे सर्व नियमांचे पालन करत शांततेत करण्यात येणार आहे, अशी माहिती शिवाजी ट्रेलचे संचालक सचिन तोडकर यांनी दिली.

Web Title: Simultaneous Durga Puja on 142 forts this coming Sunday