शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शांतता...घरफोडी अजून सुरुच आहे..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 15:58 IST

दहशत नेमकी कुणाची पोलिसांची की दरोडेखोरांची ..

ठळक मुद्देघरफोडीच्या आणखी तीन घटना

पुणे :  दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पोलीस प्रशासने सांगितल्यानुसार आवश्यक ती काळजी घेतल्यानंतर देखील चोरट्यांचा धुमाकुळ सुरु असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे. शहरातील मध्यवस्तीत दिवसाढवळया घरात शिरुन लाखो रुपयांचा मुद्देमाल लांबविण्याचे प्रकार अद्याप सुरु आहेत. दरदिवशी होणाऱ्या घरफोड्यांकडे शांतपणे बघत राहायचे का? असा प्रश्न आता नागरिकांनी पोलिस प्रशासनाला विचारला आहे.  एरंडवणे येथील सुशिलानगरी इमारतीत 17 ते 18 ऑगस्ट दरम्यान घरफोडीची घटना घडली. यात चोरट्यांनी मौल्यवान घडयाळ, सोन्या चांदीचे तसेच हि-याचे दागिने असा एकूण 7 लाख 93 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरला. याप्रकरणी धवल जोशी (वय 33, रा.एरंडवणे) यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जोशी हे बाहेरगावी गेले असताना त्यांंच्या घराच्या मुख्य दरवाजाचे लोखंडी ग्रीलचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. त्यानंतर बेडरुम मधील कपाटातून घडयाळ, सोन्या चांदीचे व हि-याचे दागिने चोरुन नेले. याप्रकरणाचा तपास अलंकार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एच ए ढोले हे करीत आहेत. वडगाव शेरी तील सोपानगर भागात चोरट्यांनी घरफोडी करुन 2 लाख 62 हजारांचा ऐवज लुटून नेला. याप्रकरणी चंद्रकांत भोसले (वय 32, रा.सोपाननगर) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याठिकाणी 19 आॅगस्ट रोजी सकाळी 9 ते दुपारी 12.30 दरम्यान घरफोडी करण्यात आली.  त्यातून सोन्या चांदीचे दागिने लंपास करण्यात आले. याप्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व्ही.एस.चव्हाण करीत आहेत.  घरफोडीची तिसरी घटना येरवड्यातील कल्याणीनगर भागात घडली. फिर्यादी प्रदीप अगरवाल (वय 50, रा. कल्याणीनगर) यांच्या घरातील काचेच्या स्लायडिंगच्या बाहेरील लोखंडी गेटचा कोयंडा तोडून चोरट्यांनी 2 लाख 44 हजारांचा ऐवज चोरुन नेला. यात कपाटातील 14 हजार रुपयांची रोख रक्कम, एक तिजोरी, सोन्याचे - चांदीचे नाणे, व घराच्या चाव्या असे चोरी गेलेल्या मुद्देमालाचे स्वरुप आहे. येरवडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बी ए ननावरे पुढील तपास करीत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसtheftचोरीArrestअटकThiefचोर