शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

दोन वर्षे सातत्याने परीक्षेची ''नीट'' तयारी ; पुण्याचा सिद्धांत दाते राज्यात तिसरा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2019 5:24 PM

जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील सिद्धांत दाते याने वैद्यकीय प्रवेशासाठी घेतल्या जाणा-या नीट परीक्षेत ६८५ गुण मिळवून देशात पन्नासावा आणि महाराष्ट्रात तिसरा क्रमांक पटकावला आहे.

ठळक मुद्देफर्ग्युसनमध्ये शिक्षण : जुन्नर तालुक्यातील ओतूरचा रहिवासीनीट परीक्षेत पुण्याचा सिध्दार्थ दाते राज्यात तिसरा

पुणे: जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील सिद्धांत दाते याने वैद्यकीय प्रवेशासाठी घेतल्या जाणा-या नीट परीक्षेत ६८५ गुण मिळवून देशात पन्नासावा आणि महाराष्ट्रात तिसरा क्रमांक पटकावला आहे. सिद्धांत हा फर्ग्युसन महाविद्यालयाचाविद्यार्थी आहे. ‘इयत्ता अकरावी पासून सलग दोन वर्षे सातत्याने नीटची तयारी केल्यामुळे परीक्षेत यश मिळाल्या’चे सिद्धांतने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

वैद्यकीय परीक्षेसाठी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला असून नाशिक येथील सार्थक भट याने देशात सहावा आणि महाराष्ट्रात प्रथम,सांगलीच्या साईराज माने याने राज्यात दुसरा तर पुण्यातील सिद्धांत दाते याने राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे. सिद्धांत  सुशिक्षित कुटुंबातील असून त्याचे आई -वडील दोघेही शिक्षक आहेत. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी घेतल्या जाणाऱ्या नीट परीक्षेत राजस्थानच्या नलीन खंडेलवाल ९९.९९ पर्सेन्टाइल आणि ७०१ गुण मिळवून देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. मुलींमध्ये देशात तेलंगणा येथील माधुरी रेड्डी हिने प्रथम क्रमांक मिळवला आहे तर दिशा अगरवाल हिने महाराष्ट्रात मुलींमध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. 

सिद्धांत दाते म्हणाला, शिक्षक आणि वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेची माहिती असणा-या व्यक्तींचे योग्य मार्गदर्शन मिळाल्यामुळे मला नीट परीक्षेत चांगले गुण मिळाले.बारावीच्या परीक्षेपेक्षा मी नीट परीक्षेकडे अधिक लक्ष दिले. इयत्ता अकरावी पासूनच मी नीट परीक्षेच्या तयारीला सुरूवात केली.महाविद्यालयाचे वर्ग, खासगी शिकवणी आणि दररोज आठ तास अभ्यास केला.तर सुट्टीच्या दिवशी मिळेल तेवढा वेळ नीटच्या तयारीसाठी घालवला.मित्रांबरोबर ग्रुप डिस्कशन केल्यामुळे अभ्यास अधिक सोपा झाला.जुन्नर येथील कुकडी व्हॅली शाळेतून दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले.मला दहावीला ९८.६ टक्के गुण मिळाले.त्यानंतर मी पुण्यात मित्रांबरोबर खोली घेवून फर्ग्युसन महाविद्यालयात अकरावी बारावीचे शिक्षण घेतले,असे नमूद करून सिद्धांत म्हणाला, बारावीत मला ८७ टक्के गुण मिळाले. केवळ तासंतास अभ्यास करून उपयोग नाही तर अभ्यासाला योग्य दिशा असणे गरजेचे आहे.मला नीटमध्ये ६८५ गुण, ५० रॅक आणि ९९.९९४९ पर्सेंटाईल मिळाले आहेत. 

टॅग्स :examपरीक्षाResult Dayपरिणाम दिवसMedicalवैद्यकीयStudentविद्यार्थीfergusson collegeफर्ग्युसन महाविद्यालय