श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदाच्या उमेदवारीसाठी ‘अजितदादा’ घेणार तोंडी परीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 19:06 IST2025-04-18T19:04:20+5:302025-04-18T19:06:30+5:30

पवार,भरणे,जाचक यांच्या उपस्थितीत गुरुवारी होणार मुलाखत

Shree Chhatrapati Cooperative Sugar Factory Ajit pawar will take oral exam for candidacy for the post of director of Chhatrapati | श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदाच्या उमेदवारीसाठी ‘अजितदादा’ घेणार तोंडी परीक्षा

श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदाच्या उमेदवारीसाठी ‘अजितदादा’ घेणार तोंडी परीक्षा

बारामती - भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची २०२५-२६ ते २०३०-३१ कालावधीसाठी संचालकपदाची निवडणुक होत आहे.कोट्यावधींचे कर्ज असलेल्या या कारखान्याची यंदा राजकीय समीकरणे बदलल्याने इच्छुकांची मोठी भाऊगर्दी झाली आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने बारामती येथे गुरवारी(दि २४) नामनिर्दिष्ठ सर्वपक्षीय उमेदवारांची मुलाखत /,चर्चा गट निहाय आयोजित केली आहे .

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, कॅबिनेट मंत्री दत्तात्रय मामा भरणे उपस्थित राहणार आहेत,याबाबत निवडणुक समन्वयक किरण गुजर,सर्वपक्षीय पॅनल प्रमुख पृथवीराज जाचक यांनी माहिती दिली.

गुरुवारी सकाळी ९ ते दुपारी ३ या कालावधीत इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत.भवानीनगर येथे झालेल्या सर्वपक्षीय कार्यकर्ता सभेत उपमुख्यमंत्री पवार यांनी आदर्श संचालकपदाबाबतच्या त्यांच्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.त्यामुळे कारखाना पुर्वपदावर आणण्यासाठी क्षमता असणार्या संबंधित उमेदवारांनाच पवार संधी देणार आहेत.लोकसभा,विधानसभा निवडणुकी सह स`थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये वेगळे लोक निवडुन गेल्यास विकासकामांवर परीणाम होतो.मात्र,दुध संघ,साखर कारखाना निवडणुकीत चुकीच्या लोकांना निवडुन दिल्यास त्याची जबरदस्त किंमत मोजावी लागते.त्याचा थेट आपल्या प्रपंचावर परीणाम होाते.

ज्यांचा राजकारणाचा संबंध नाही,अशा नवीन चेहर्यांना यंदा संधी देणार आहे,जे चांगले काम करतीलं.कारखान्यात ऊसवाहतुकीला ट्रॅक्टर असणार्यांना आजिबात उमेदवारी अर्ज भरु नये.

तसेच विविध पदे भुषविलेल्यांनी देखील अर्ज भरु नये.जनमाणसंात स्वच्छ प्रतिमा असणार्यांनीच अर्ज करावेत,ज्याचा व्यवसाय,धंदा चांगला आहे,अशा लोकांना अर्ज भरायला सांगा,अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री पवार यांनी निवडणुक लढणार्या चेहर्याबद्दल व्यक्त केली आहे.त्यामुळे पवार यांच्या अपेक्षेला खर्या ठरणार्या इच्छुकाच्याच गळ्यात उमेदवारीची माळ पडणार आहे.यामध्ये मंत्री भरणे यांच्यासह जाचक यांंची भुमिका देखील निर्णायक ठरणार आहे. यंदा राजकारण बाजुला ठेवुन ‘छत्रपती’ला पुर्ववैभव प्राप्त करुन देण्याचा निर्धार व्यक्त करीत पवार यांनी राजकीय रणनीती आखल्याचे चित्र आहे.

कुठले नशीब घेवून जन्माला आले होते.....

मागील संचालक मंडळाला विविध कारणांमुळे जवळपास दहा वर्ष काम करण्याची संधी मिळाली. गेल्या १० वर्षांपासुन सत्तेवर असणार्या संचालक मंडळाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्ता मेळाव्याच्या भर सभेत इशारा दिला आहे.कुठले नशीब घेवून जन्माला आले होते,काय माहिती? त्यांना १० वर्ष मिळाले.आता बास त्यांनी थांबावे,अशा शब्दात पवार यांनी जुन्या संचालक मंडळात काम केलेल्या संचालकांनी उमेदवारी अर्ज दाखल न करण्याचा सुचित केले आहे.

Web Title: Shree Chhatrapati Cooperative Sugar Factory Ajit pawar will take oral exam for candidacy for the post of director of Chhatrapati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.