लग्नाचे आमिष दाखवून पोलिसाकडून बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 12:31 IST2018-03-17T12:31:33+5:302018-03-17T12:31:33+5:30

पीडित विधवा महिलेला लग्नाचे आमिष दाखवून शिवाजी सरडे याने महिलेशी २०१४ पासून उरुळीकांचन येथील राहत्या घरी, लोणी स्टेशन तसेच गुजरात राज्यात नेऊन शरीरसंबंध ठेवले.

showing marriage bait raped by Police | लग्नाचे आमिष दाखवून पोलिसाकडून बलात्कार

लग्नाचे आमिष दाखवून पोलिसाकडून बलात्कार

ठळक मुद्देपोलीस हवालदार शिवाजी आनंदा सरडे (वय ४५, रा. पेरणे, सरडेवस्ती, ता. हवेली) याच्यावर गुन्हा दाखल आरोपी शिवाजी सरडे फरार

उरुळीकांचन : विधवा महिलेला लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी  लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पुणे पोलीस हवालदारावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
पोलीस हवालदार शिवाजी आनंदा सरडे (वय ४५, रा. पेरणे, सरडेवस्ती, ता. हवेली) याच्यावर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पीडित विधवा महिलेला लग्नाचे आमिष दाखवून शिवाजी सरडे याने महिलेशी २०१४ पासून उरुळीकांचन येथील राहत्या घरी, लोणी स्टेशन तसेच गुजरात राज्यात नेऊन शरीरसंबंध ठेवले. महिलेने विवाहाची विचारपूस केली असता टाळाटाळ केल्याने पीडितने तक्रार दिली आहे. आरोपी शिवाजी सरडे फरार झाला आहे. 

Web Title: showing marriage bait raped by Police