शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
2
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
3
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
4
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
5
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
6
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
7
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!
8
“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
9
रोकड, सोनंनाणं आणि..., निवृत्त अबकारी अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड    
10
Dhan Teras 2025: धनत्रयोदशीला धन्वंतरीची आणि लक्ष्मीची पुजा करण्यामागे आहे पौराणिक कारण!
11
बाजारात 'सुपर वेन्सडे'! सेन्सेक्स ८२,६०० पार; गुंतवणूकदारांनी एकाच दिवसात कमावले ४.२९ लाख कोटी
12
'या' कंपनीवर लागला बॅन, शेअर्स आपटले; बोनस शेअर्स देणं आणि शेअर्स स्प्लिटवरही बंदी, कोणता आहे स्टॉक?
13
Mumbai Crime: सफाई करताना दरोडेखोर घुसले; दागिने वाचवणाऱ्या दुकानमालकावर केले वार, घाटकोपरमध्ये ज्वेलर्सला लुटले
14
जखमेवर मीठ! ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, आयसीसीनं ठोठावला दंड
15
निवडणुक आयोगाकडे विरोधकांच्या चकरा म्हणजे 'फियास्को', देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका
16
'निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने कारण शोधण्याचा खटाटोप'; शिष्ठमंडळाच्या बैठकीवर शंभूराज देसाईंची टीका
17
Gold Price Today 15 October: आजही सोन्यात तेजी, पण चांदीचे दर घसरले; पाहा १८,२२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर
18
अरे बापरे! तुम्हीही प्लास्टिकचा कोबी खाताय? धक्कादायक Video पाहून व्हाल हैराण
19
दुर्गापूरमध्ये मित्रानेच एमबीबीएस विद्यार्थिनीवर लैगिक अत्याचार केले? पोलिसांनी केली अटक
20
Bihar Election JDU: चिराग पासवानांना नितीश कुमारांचा झटका; दावा केलेल्या जागांवरच उतरवले उमेदवार

शस्त्र परवान्यासाठी बनाव? युवासेना जिल्हाध्यक्ष घारे यांच्या गोळीबार प्रकरणाचा पर्दाफाश

By किरण शिंदे | Updated: May 26, 2025 16:52 IST

पोलीस संरक्षण मिळावे आणि आपले प्राण धोक्यात असल्याचे दाखवण्यासाठी हा डाव रचल्याचा संशय पोलिसांना आहे

पुणे: 19 मे रोजी रात्री वारजे माळवाडी परिसरात घडलेली गोळीबाराची घटना आता नाट्यमय वळणावर आली आहे. सुरुवातीला अज्ञात हल्लेखोरांनी शिवसेनेच्या युवासेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष निलेश घारे यांच्या गाडीवर गोळीबार केल्याची माहिती समोर आली होती. मात्र, वारजे पोलिसांच्या तपासात हा गोळीबार स्वतः घारे यांनीच आखलेला कट होता, ज्यामागे मुख्य उद्देश होता शस्त्र परवाना मिळवणे आणि पोलिस संरक्षण मिळवणे.

घटनास्थळाचा तपशील

19 मे रोजी रात्री 12 वाजताच्या सुमारास घारे आपल्या सहकाऱ्यांसोबत माळवाडी येथील जनसंपर्क कार्यालयात पोहोचले होते. कार्यालयाबाहेर त्यांच्या काळ्या रंगाच्या चारचाकी वाहनावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केला. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. या घटनेनंतर घारे यांनी थेट पोलिसांकडे धाव घेतली आणि तक्रार दाखल केली.

घटनेनंतर वारजे पोलिस स्टेशन आणि गुन्हे शाखेचे अधिकारी सक्रिय झाले. तपासात मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल्स आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांनी चौकशीत कबूल केले की, निलेश घारे यांच्या सांगण्यावरूनच हा बनाव रचण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी सचिन गोळे,  शुभम खेमणार आणि अजय उर्फ बगली सकपाळ या तिघांना अटक केली. तर अन्य एक आरोपी संकेत मातले, सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

शस्त्र परवाना मिळवण्यासाठी बनाव?

मिळालेल्या माहितीनुसार, घारे यांनी काही महिन्यांपूर्वी वारजे पोलिस ठाण्यात शस्त्र परवाना मिळवण्यासाठी अर्ज केला होता, मात्र तो फेटाळण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी पोलिस संरक्षण मिळावे आणि आपले प्राण धोक्यात असल्याचे दाखवण्यासाठी हा डाव रचल्याचा संशय पोलिसांना आहे. सद्यस्थितीत पोलिसांकडून अधिक चौकशी केली जात असून घारे यांची भूमिका संशयास्पद मानली जात आहे. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्येही यावर तीव्र चर्चा सुरू आहे. पुढील तपासात घारे यांच्यावर गुन्हा दाखल होतो का आणि पोलिस त्यांना अटक करतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसShiv SenaशिवसेनाCrime Newsगुन्हेगारीArrestअटक