लोखंडी रॉड डोक्यात मारून दुकानदाराला केले जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 12:46 IST2021-03-29T12:46:14+5:302021-03-29T12:46:47+5:30

आरोपीने मागितले होते पैसे

The shopkeeper was hit in the head with an iron rod | लोखंडी रॉड डोक्यात मारून दुकानदाराला केले जखमी

लोखंडी रॉड डोक्यात मारून दुकानदाराला केले जखमी

ठळक मुद्देआरोपी दुकान विकूनही मागत होता पैसे

पिंपरी : दुकान बंद करण्यास नकार दिल्याने लोखंडी टॉमी डोक्यात मारून दुकानदाराला जखमी केले. ही घटना शनिवारी  दुपारी साडेतीनच्या सुमारास गणेश साम्राज्य चौक, पुणे -नाशिक महामार्ग, मोशी येथे घडली. 

मोहम्मद कलीमुद्दीन मनसुरी (वय ३३, रा. बिहार), यांनी या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुरेशकुमार पनीकर (रा. इंद्रायणीनगर, भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे केरला टायर नावाच्या दुकानावर थांबले होते. यावेळी नशेत आरोपी तेथे आला. दुकान माझे आहे, मला पैसे दे, असे आरोपी म्हणाला. तुम्ही अनिल पनीकर यांना दुकान विकले आहे. त्यामुळे दुकानाचे मालक आहेत. दुकानाच्या धंद्याचा झालेला पैशांचा हिशेब अनिल पनीकर यांना देत असतो. त्यामुळे मी तुम्हाला पैसे देऊ शकत नाही, असे फिर्यादीने सांगितले. यावर आरोपीने दुकान बंद करण्यास सांगितले. दुकानाचे मालक अनिल पनीकर यांनी सांगितल्यावरच दुकान बंद करेल, असे फिर्यादीने म्हणाला. त्याच क्षणी आरोपीने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच दुकानातील लोखंडी रॉड घेऊन फिर्यादीच्या डोक्यात मारून जखमी केले, असे फिर्यादीत नमूद केले आहे.

Web Title: The shopkeeper was hit in the head with an iron rod