शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

दौंडच्या कलाकेंद्रात गोळीबार झाल्याची चर्चा; पोलिसांनी चौकशीअंती दावा फेटाळला, पण राजकारणाला वेग आला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 12:37 IST

पोलिसांकडून सीसीटीव्ही तपासले जात असून २४ तास होऊनही काहीच समोर न आल्याने हे प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात असल्याचे दिसून येत आहे

पुणे : दौंडच्या कलाकेंद्रात काल रात्री गोळीबार झाल्याची चर्चा असल्याची माहिती समोर आली आहे. चौफुला इथून पुढे न्यू अंबिका कला केंद्रात गाणी वाजवण्यावरून दोन गटात वाद झाला. त्यामध्ये गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, दौंड तालुक्यातील चौफुलाच्या पुढे न्यू अंबिका कलाकेंद्र आहे. कलाकेंद्रात काल रात्री गोळीबार झाल्याची घटना घडली असल्याची चर्चा आहे. कलाकेंद्रात दोन गटात वादावादी झाली. लावणी वाजवायची कि डीजेवरची गाणी वाजवायची यावरून वाद झाला होता. त्यावेळी गोळीबार झाल्याची माहिती समोर आली असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले आहे. पोलिसांना याबाबत विचारले असता त्यांनी सीसीटीव्ही तपासणी सुरु असल्याचे सांगितले आहे. तसेच गोळीबार झाला नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. ती व्यक्ती एका आमदाराच्या जवळची असल्याने हे प्रकरण झाकले जात असल्याचं आरोपही होऊ लागला आहे. २४  तास उलटूनही पोलिसांना या प्रकरणाची काहीच माहिती मिळाली नाहीये. कला केंद्राच्या मालकांना विचारले असता त्यांनी गोळीबार झाला नसल्याचे सांगितले आहे. आमच्याकडे हा प्रकार हा घडला नाही. पोलिसांनी चौकशी करावी असेही त्या म्हणाल्या आहेत. जर तसं काही आढळल्यास कारवाई करावी असंही न्यू अंबिका कला केंद्राचे मालक म्हणाले आहेत.

प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात 

दौंडचा गोळीबाराचा तपास पोलीस करत आहेत. सीसीटीव्ही तपासले जात असल्याचे त्यांनी सांगितले आहे. २४ तास होऊनही काहीच समोर न आल्याने हे प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. पुणे जिल्ह्यातील एका सत्ताधारी आमदाराच्या भावाने गोळीबार केल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे या विषयावरून राजकारण रंगणार, असं चित्र दिसतंय.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMLAआमदारIndapurइंदापूरcctvसीसीटीव्हीWomenमहिला