धक्कादायक! मोटारीच्या किरकोळ वादावरून मायलेकीला बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 18:18 IST2021-03-10T17:52:25+5:302021-03-10T18:18:45+5:30

नळाला लावलेली मोटार बंद करण्यास सांगितले

Shocking! women beaten over minor water dispute | धक्कादायक! मोटारीच्या किरकोळ वादावरून मायलेकीला बेदम मारहाण

धक्कादायक! मोटारीच्या किरकोळ वादावरून मायलेकीला बेदम मारहाण

ठळक मुद्देकिरकोळ पाण्याच्या वादावरून घडलेला प्रकार

पिंपरी : नळाला लावलेली मोटार बंद करण्यास सांगितल्याने चौघांनी महिलेला व तिच्या वृद्ध आईला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी कैलास नगर येथे घडला आहे.

सविता गुरुचरणसिंग दरबार (वय ७३), असे दुखापत झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. परमजीतकौर निर्मलसिंग ब्लगन ( कैलास नगर, पिंपरी ) यांनी या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुनिता रामनरेश चौहान (कैलास नगर, पिंपरी), काजल राम नरेश चौहान (कैलास नगर, पिंपरी), खुशी रामनरेश चौहान (कैलास नगर, पिंपरी), राम नरेश नेपालसिंग चौहान (कैलास नगर, पिंपरी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी परमजित कौर यांच्या घरच्या नळाला मोटार लावल्याने पाणी येणे बंद झाले. तुमच्या घराच्या नळाला लावलेली मोटार बंद करा, आमच्या घरच्या नळाला पाणी येत नाही, असे कौर यांनी  आरोपींना सांगितले. त्यावर आरोपींनी मोटार बंद करण्यास नकार दिला. त्यानंतर कौर यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. त्यावेळी त्यांच्या आई सविता दरबार या भांडणे सोडविण्याचा प्रयत्न करीत होत्या. आरोपींनी सविता यांना ढकलून दिल्याने त्यांना दुखापत झाली आहे. 

Web Title: Shocking! women beaten over minor water dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.