खळबळजनक ! बारामती तालुक्यातील काटेवाडीत ऊसाच्या शेतात आढळला महिलेचा सांगाडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2021 20:23 IST2021-02-17T20:23:06+5:302021-02-17T20:23:39+5:30
ऊसतोडणी सुरु कामगारांना महिलेचा सांगाडा दिसुन आला...

खळबळजनक ! बारामती तालुक्यातील काटेवाडीत ऊसाच्या शेतात आढळला महिलेचा सांगाडा
बारामती : बारामती तालुक्यातील काटेवाडी येथे ऊसाच्या शेतात महिलेच्या हाडाचा सांगाडा सापडल्याने खळबळ उडाली आहे. साखर कारखान्याच्या गाळपासाठी ऊस तोडणी सुुरु असताना हा प्रकार समोर आला. येथील शेतकऱ्याच्या शेतात ऊसतोडणी सुरु होती.यावेळी ऊसतोडणी कामगारांना महिलेचा सांगाडा दिसुन आला. सांगाड्यावर साडी तसेच बाजुला चप्पल देखील आढळुन आली आहे.
याबाबत पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी सांगितले,काटेवाडी येथील शेतात एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता.या महिलेचा मृतदेह पूर्ण ‘डी-कम्पोज’ झाला आहे.सरकारी दखाखान्यात हा मृतदेह आणण्यात आला आहे.या मृतदेहाचे केस,हाड राखीव ठेवण्यात येणार आहेत.त्यातुन डॉक्टरांच्या मदतीने विविध तपासण्यानंतर महिलेच्या मृत्युचे कारण समजु शकणार आहे.सहा ते सात महिन्यांपूर्वी या महिलेचा मृत्यू झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
————