शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात खळबळजनक प्रकार उघड! काँग्रेस शहराध्यक्षांच्या नावावरच बोगस मतदान

By राजू हिंगे | Updated: May 13, 2024 13:56 IST

सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सेंट मीराज् स्कूलमध्ये मतदानासाठी गेल्यानंतर त्यांच्या नावावर मतदान झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला...

पुणे :पुणे लोकसभा मतदार संघातील सेंट मीराज् स्कूलमधील मतदान केंद्रावर काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नावावर बोगस मतदान झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शिंदे यांनी मतदान अधिकारी यांच्याकडे तक्रार करून चॅलेंज व्होट, फॉर्म भरला, ११७ बी नुसार मतदान केले. 

पुणे लोकसभा मतदारसंघासाठी सकाळपासून मतदान प्रक्रिया उत्साहात सुरू आहे. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सेंट मीराज् स्कूलमध्ये मतदानासाठी गेल्यानंतर त्यांच्या नावावर मतदान झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यांच्या नावावर कोणीतरी अज्ञात व्यक्ती मतदान करून गेल्याचा प्रकार उघडकीस आला. परंतु तरीही शिंदे यांना टेंडर व्होट अंतर्गत मतदान करण्याची संधी दिली गेली. परंतु त्याची गणना आपत्कालीन परिस्थितीत केली जाऊ शकते. 

अरविंद शिंदे म्हणाले, " मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलो होतो. त्यावेळी पोलिंग बूथच्या  रजिस्टरमध्ये माझ्या नावावर कोणीतरी मतदान केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या संदर्भात मी संबंधित अधिकारी यांच्याकडे तक्रार दिली आहे. त्यानंतर चॅलेंज व्होट, टेंडर व्होट फॉर्म भरला, ११७ बी  नुसार मतदान केले. त्यात त्यांनी बॅलेट पेपर वर मतदान केले".

टॅग्स :pune-pcपुणेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Votingमतदानbig Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४