धक्कादायक! पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेतील महिला पोलीस निरीक्षकाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 14:33 IST2021-12-31T14:32:57+5:302021-12-31T14:33:36+5:30
पुणे शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेत पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असणाऱ्या शिल्पा चव्हाण यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली

धक्कादायक! पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेतील महिला पोलीस निरीक्षकाची आत्महत्या
पुणे : पुणे शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेत पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असणाऱ्या शिल्पा चव्हाण यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. राहत्या घरात त्यांनी गळफास घेत जीवन संपवले. आज दुपारच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. या घटनेने संपूर्ण पुणे शहर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
शिल्पा चव्हाण या गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागाच्या प्रभारी म्हणून कामकाज पाहत होत्या. यापूर्वी त्यांनी पोलीस दलातील विशेष शाखेत काम केले आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी त्यांना गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागाच्या प्रभार देण्यात आला होता.
दरम्यान आज सकाळच्या सुमारास त्यांनी पुण्यातील त्यांच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकिस आले. दरम्यान एका महिला पोलीस निरीक्षक काळे कशाप्रकारे आत्महत्या केल्याचं समोर आल्यानंतर संपूर्ण पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.