धक्कादायक! पुणे-सातारा बसमध्ये तरुणीसमोर अश्लील चाळे; आरोपीला पोलिसांनी घेतलं ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 23:00 IST2025-03-08T23:00:04+5:302025-03-08T23:00:27+5:30
विकृत तरुणास राजगड पोलिसांनी अथक प्रयत्नाने आज ताब्यात घेतले.

धक्कादायक! पुणे-सातारा बसमध्ये तरुणीसमोर अश्लील चाळे; आरोपीला पोलिसांनी घेतलं ताब्यात
वैभव भुतकर, लोकमत न्यूज नेटवर्क, नसरापूर : दोन दिवसांपूर्वी सातारा ते पुणे बसमध्ये प्रवाशाने सहप्रवासी तरुणीसमोर स्वतःशीच उघडपणे अश्लील चाळे करून लज्जा उत्पन्न केल्याचा प्रकार घडला. सदर विकृत तरुणास राजगड पोलिसांनी अथक प्रयत्नाने आज ताब्यात घेतले.
याप्रकरणी राजगड पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीवरून कमलेश प्रल्हाद शिरसाठ वय ४१ वर्षे सध्या रा.आंबेगाव खुर्द, पुणे मूळ रा. पी.एम.सी. बँकेसमोर, बदलापूर ईस्ट, जि.ठाणे यास ताब्यात घेतले आहे. ५ मार्च रोजी सातारा ते पुणे या बसमध्ये शिरवळ बस थांब्यावर एक अनोळखी पुरुष बसमध्ये चढून, फिर्यादी तरुणी बसमध्ये बसलेल्या सीटच्या उजव्या बाजूला असणाऱ्या सीटवर बसला आणि फिर्यादीकडे बघून त्याने स्वतःशीच उघडपणे अश्लील चाळे करून लज्जा उत्पन्न करण्याचा विकृत प्रकार केला. त्या तरुणास राजगड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सदरच्या संवेदनशील गुन्ह्यासंदर्भात तातडीने कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी राजगड पोलिसांना दिल्याने राजगड पोलीस निरीक्षक राजेश यांनी तपास पथक तयार करून या गुन्ह्यातील आरोपीस तातडीने पकडण्याबाबत सक्त सूचना केल्या. त्यानंतर तपास पथकाने सातारा ते पुणे हायवेवरील सुमारे ७० ते ८० सी.सी.टी.व्ही. कॅमेरे चेक करून दिवस-रात्र कौशल्यपूर्ण तपास करून अनोळखी आरोपीचा मागोवा घेत आरोपीस शिताफीने ताब्यात घेतले. पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील, पो. कॉ अक्षय नलावडे, मंगेश कुंभार, विकास साळुंखे यांनी ही कामगिरी केली आहे.