शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

पुण्यातल्या मुळशीतील धक्कदायक घटना! पतीच्या बेदम मारहाणीत पत्नीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2021 11:32 AM

मुळशी तालुक्यातील डावजे गावात पवार याच्या घरी ७ जुलै रोजी दुपारी ३ वाजता घडली

ठळक मुद्देमारहाणीमुळे पत्नी बेशुद्ध होऊन निपचित पडली. त्यानंतर तिला रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी तिचा मृत्यु झाल्याचे सांगितले.

पुणे: घरात काही काम करत नाही. कामालाही जात नाही, या किरकोळ कारणावरुन चिडून पतीने काठीने, हाताने व लाथाबुक्क्यांनी पत्नीला बेदम मारहाण केली. त्यात पत्नीचा मृत्यु झाला असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पती परशुराम शांताराम पवार याच्या विरोधात पौडपोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मंदा परशुराम पवार असे मृत्यु पावलेल्या पत्नीचे नाव आहे. ही घटना मुळशी तालुक्यातील डावजे गावात पवार याच्या घरी ७ जुलै रोजी दुपारी ३ वाजता घडली.

याप्रकरणी अर्जुन किसन जाधव (वय ३०, रा. जातेडे, पो. मुठा, ता. मुळशी) यांनी पौडपोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघेही कातकरी समाजातील आहेत. मंदा या अंगाने अशक्त होत्या. त्यामुळे त्यांच्याकडून काम होत नव्हते. यावरुन त्यांच्यात वारंवार भांडणे होत असत.

मंदा या ७ जुलै रोजी कामाला गेल्या नाही. यावरुन दोघा पतीपत्नीत जोरदार भांडणे झाली. त्यात परशुरामने त्याच्या जवळील काठीने मंदाला मारहाण केली. तसेच हाताने व लाथाबुक्कयाने बेदम मारले. मारहाणीमुळे मंदा बेशुद्ध होऊन निपचित पडली. त्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तिचा मृत्यु झाल्याचे सांगितले. पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकPaudपौड