पुण्यातल्या मुळशीतील धक्कदायक घटना! पतीच्या बेदम मारहाणीत पत्नीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 11:32 IST2021-07-09T11:32:14+5:302021-07-09T11:32:22+5:30

मुळशी तालुक्यातील डावजे गावात पवार याच्या घरी ७ जुलै रोजी दुपारी ३ वाजता घडली

Shocking incident in Pune! Wife beaten to death by husband | पुण्यातल्या मुळशीतील धक्कदायक घटना! पतीच्या बेदम मारहाणीत पत्नीचा मृत्यू

पुण्यातल्या मुळशीतील धक्कदायक घटना! पतीच्या बेदम मारहाणीत पत्नीचा मृत्यू

ठळक मुद्देमारहाणीमुळे पत्नी बेशुद्ध होऊन निपचित पडली. त्यानंतर तिला रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी तिचा मृत्यु झाल्याचे सांगितले.

पुणे: घरात काही काम करत नाही. कामालाही जात नाही, या किरकोळ कारणावरुन चिडून पतीने काठीने, हाताने व लाथाबुक्क्यांनी पत्नीला बेदम मारहाण केली. त्यात पत्नीचा मृत्यु झाला असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पती परशुराम शांताराम पवार याच्या विरोधात पौडपोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मंदा परशुराम पवार असे मृत्यु पावलेल्या पत्नीचे नाव आहे. ही घटना मुळशी तालुक्यातील डावजे गावात पवार याच्या घरी ७ जुलै रोजी दुपारी ३ वाजता घडली.

याप्रकरणी अर्जुन किसन जाधव (वय ३०, रा. जातेडे, पो. मुठा, ता. मुळशी) यांनी पौडपोलिसांकडे फिर्याद दिली आहे. 
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघेही कातकरी समाजातील आहेत. मंदा या अंगाने अशक्त होत्या. त्यामुळे त्यांच्याकडून काम होत नव्हते. यावरुन त्यांच्यात वारंवार भांडणे होत असत.

मंदा या ७ जुलै रोजी कामाला गेल्या नाही. यावरुन दोघा पतीपत्नीत जोरदार भांडणे झाली. त्यात परशुरामने त्याच्या जवळील काठीने मंदाला मारहाण केली. तसेच हाताने व लाथाबुक्कयाने बेदम मारले. मारहाणीमुळे मंदा बेशुद्ध होऊन निपचित पडली. त्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तिचा मृत्यु झाल्याचे सांगितले. पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Shocking incident in Pune! Wife beaten to death by husband