Pune Crime: पुण्यातील धक्कादायक घटना; लोणीकंदमध्ये मुलगा व वडिलांचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2022 20:37 IST2022-01-12T20:36:42+5:302022-01-12T20:37:04+5:30

गोल्डमॅन सचिन शिंदे याचा खून प्रकरणातील आरोपीचा जामीनावर सुटून आल्यानंतर ५ ते ६ जणांच्या टोळक्याने कोयता, बेसबॉलची स्टीक व दगडाने मारहाण करुन त्याचा खून केला

Shocking incident in Pune Son and father murdered in Lonikanda | Pune Crime: पुण्यातील धक्कादायक घटना; लोणीकंदमध्ये मुलगा व वडिलांचा खून

Pune Crime: पुण्यातील धक्कादायक घटना; लोणीकंदमध्ये मुलगा व वडिलांचा खून

पुणे : गोल्डमॅन सचिन शिंदे याचा खून प्रकरणातील आरोपीचा जामीनावर सुटून आल्यानंतर ५ ते ६ जणांच्या टोळक्याने कोयता, बेसबॉलची स्टीक व दगडाने मारहाण करुन त्याचा खून केला. मुलाला सोडविण्यासाठी मध्ये आलेल्या त्याच्या वडिलांनाही हल्लेखोरांनी वार करुन त्यांचाही खून केला.

सनी कुमार शिंदे (वय २२) आणि कुमार शिंदे (वय ५५, रा. लोणीकंद) अशी खून झालेल्या वडिल मुलाचे नाव आहे.
याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी सांगितले की, सचिन शिंदे याचा गेल्या वर्षी गोळीबार करुन खून करण्यात आला होता. याप्रकरणात सनी शिंदेसह तिघांना अटक करण्यात आली होती.

सुमारे ३ महिन्यांपूर्वी सनी शिंदे याला जामीन मिळाल्याने तो बाहेर आला होता. आज सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास लोणीकंद येथील शाळेच्या मागच्या बाजूला सनी असताना ५ ते ६ जणांनी त्याला गाठले. त्याच्यावर कोयता, बेसबॉलची स्टीक व दगडाने मारहाण केली. मुलाला मारहाण होत असल्याचे पाहून त्याचे वडिल कुमार हेही मध्ये पडले. हल्लेखोरांनी दोघांवरही वार करुन त्यांचा खून केला व ते पळून गेले. घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलीस घटनास्थळी पोहचले असून त्यांनी हल्लेखोरांच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत.

Web Title: Shocking incident in Pune Son and father murdered in Lonikanda