पुण्यातील धक्कादायक घटना; गोळ्या झाडून १७ वर्षीय युवकाचा खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2021 10:36 IST2021-12-23T10:36:39+5:302021-12-23T10:36:50+5:30
तळेगाव दाभाडे येथील नॅशनल हेवी इंजिनिअरिंग (एनएचईसी)कंपनीजवळ गुरुवारी मध्यरात्री अज्ञातांनी दशांत परदेशी याच्यावर गोळीबार केला

पुण्यातील धक्कादायक घटना; गोळ्या झाडून १७ वर्षीय युवकाचा खून
तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे येथील पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नॅशनल हेवी इंजिनिअरिंग कंपनी जवळ गोळ्या झाडून अज्ञातांनी एका १७ वर्षीय युवकाचा खून केला. ही घटना बुधवारी (दि. २३) रात्री मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
दशांत अनिल परदेशी (वय १७ रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या संदर्भात मयताचे वडील अनिल परदेशी यांनी येथील पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे येथील नॅशनल हेवी इंजिनिअरिंग (एनएचईसी)कंपनीजवळ गुरुवारी मध्यरात्री अज्ञातांनी दशांत परदेशी याच्यावर गोळीबार केला. त्यात गंभीर जखमी होऊन दशांतचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. दशांतवर कोणी आणि का हल्ला केला, याबाबत कसून तपास सुरु आहे.