शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील स्पा सेंटरमधील धक्कादायक प्रकार; 'त्या' महिलेच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीआयडीकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 15:57 IST

विमाननगर परिसरातील एका स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर विमानतळ पोलिसांच्या पथकाने सोमवारी तेथे छापा टाकला

पुणे : विमान नगर परिसरातील स्पा सेंटरमधील महिलेच्या मृत्यू प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) द्यावा, अशी मागणी महिलेच्या पतीने पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन केली आहे. त्यानुसार सीआयडी पथकाकडून तपास केला जात आहे.

विमाननगर परिसरातील एका स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर विमानतळ पोलिसांच्या पथकाने रविवारी तेथे छापा टाकला होता. पोलिसांची कारवाई, तसेच अटकेची भीती वाटल्याने महिलेसह स्पा सेंटरच्या व्यवस्थापकाने यावेळी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारली होती. या घटनेत गंभीर जखमी झाल्याने महिलेचा मृत्यू झाला. तर या सेंटरमधील व्यवस्थपाकाच्या पायाला दुखापत झाली. या प्रकरणाची सीआयडी मार्फत तपास करावा, अशी मागणी महिलेच्या पतीने पोलिस आयुक्तांकडे केली होती. त्यानुसार सीआयडीच्या पथकाने मंगळवारी घटना स्थळाच्या इमारतीस भेट देऊन संबंधितांचे जबाब नोंदवले.

दरम्यान पुण्यातील विमाननगर परिसरात रविवारी दुपारी ‘द रूट्स स्पा’ या स्पा सेंटरवर पोलिसांच्या कारवाईदरम्यान एका तरुणीने आणि स्पा सेंटरच्या मॅनेजरने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली. या घटनेत तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर मॅनेजर गंभीर जखमी झाला. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, विमानतळ पोलिसांच्या पथकाने दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास संबंधित स्पा सेंटरवर छापा टाकला. स्पामध्ये सुरू असलेल्या संशयास्पद प्रकारांबाबत पोलिसांना तक्रार प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. कारवाईदरम्यान अटक होण्याच्या भीतीने एका तरुणीने आणि मॅनेजरने दुसऱ्या मजल्यावरील खिडकीतून उडी मारल्याचे पोलिसांनी सांगितले. उडी मारल्यानंतर दोघेही गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र तरुणीचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Spa Death Case: Investigation Transferred to CID Amidst Controversy

Web Summary : Following a woman's death after jumping from a Pune spa during a police raid, the case is now with the CID. The husband requested the investigation due to suspected illegal activities at the spa.
टॅग्स :PuneपुणेWomenमहिलाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यूMONEYपैसा