धक्कादायक! पुणे शहरात अल्पवयीन मुलावर मनोरुग्णालयात अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 09:09 IST2022-10-12T09:08:32+5:302022-10-12T09:09:15+5:30

हा प्रकार मनोरग्णालयातील बराकीत एका रूममध्ये ८ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबरदरम्यान घडला...

Shocking In Pune city, a minor was abused in a psychiatric hospital | धक्कादायक! पुणे शहरात अल्पवयीन मुलावर मनोरुग्णालयात अत्याचार

धक्कादायक! पुणे शहरात अल्पवयीन मुलावर मनोरुग्णालयात अत्याचार

पुणे : येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका अल्पवयीन मुलावर तेथील मनोरुग्णाने जवळजवळ एक महिना अनैसर्गिक अत्याचार करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी येरवडा पोलिसांनी प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका २४ वर्षांच्या मनोरुग्णावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत प्रादेशिक मनोरुग्णालयातील परिचर धनराज सोनवणे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. हा प्रकार मनोरग्णालयातील बराकीत एका रूममध्ये ८ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबरदरम्यान घडला.

फिर्यादी हे मनोरुग्णालयात परिचर म्हणून नेमणुकीला आहेत. आरोपी व एका १६ वर्षाच्या मुलाला उपचारासाठी एकाच बराकीमध्ये ठेवण्यात आले आहे. या दरम्यान आरोपीने मुलाबरोबर अनैसर्गिक कृत्य केले. हा प्रकार उघड झाल्यानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Shocking In Pune city, a minor was abused in a psychiatric hospital