धक्कादायक! दोन पीएमपी बसमध्ये सापडला बस चालक; कात्रज पीएमपी आगारातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 16:43 IST2021-02-06T16:41:34+5:302021-02-06T16:43:29+5:30
गंभीर जखमी चालकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु

धक्कादायक! दोन पीएमपी बसमध्ये सापडला बस चालक; कात्रज पीएमपी आगारातील घटना
धनकवडी : वर्कशॉपमध्ये दुरुस्त झालेली पीएमपी बस ताब्यात घेण्यासाठी जात असताना एक बस चालक दोन पीएमपी बसमध्ये सापडला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना कात्रज पीएमपी आगार येथे शुक्रवारी सकाळी सहा वाजता घडली. याप्रकरणी दोन संशयित बस चालकावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमित शिवाजी मांढरे असे जखमी पीएमपी चालकाचे नाव आहे. ते शुक्रवारी सकाळी वर्कशॉपमध्ये त्यांना नेमून दिलेली बस ताब्यात घेण्यासाठी चालले होते. शेडमधून पायी जात असतानाच तीथे थांबलेल्या दोन बसपैकी एक बस चालकाने बस रिव्हर्स घेतली. बस रिव्हर्स घेत असताना मागे कोणी आहे का ? याची चाचपणी केली नाही. यामुळे मागे असलेले अमित मांढरे अचानक दोन्ही बसमध्ये सापडून गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आहे. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस सहायक पोलिस फौजदार मोहन देशमुख करत आहेत.