खळबळजनक! लोखंडी गज कापत आरोपींचे सिनेस्टाईल पोलीस कोठडीतून पलायन; भोरमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 12:39 PM2021-02-17T12:39:58+5:302021-02-17T13:05:07+5:30

पुणे-सातारा महामार्गावरील कापूरव्होळ (ता. भोर) येथे पोलिसांच्या वेशात येऊन गोळीबार करुन दहशत निर्माण करत फिल्मी स्टाईलने ज्वेलर्सवर आरोपीनी दरोडा टाकला होता.

Shocking! Cinestyle escapes from police cell of two accused by cutting iron yard; The incident at bhor | खळबळजनक! लोखंडी गज कापत आरोपींचे सिनेस्टाईल पोलीस कोठडीतून पलायन; भोरमधील घटना

खळबळजनक! लोखंडी गज कापत आरोपींचे सिनेस्टाईल पोलीस कोठडीतून पलायन; भोरमधील घटना

Next

भोर : आरोपी पोलीस कोठडीतून गज कापून पलायन करतात ही घटना अनेकदा चित्रपटात पाहायला मिळते. पण भोरमध्ये अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दोन आरोपींनी फिल्मी स्टाईलने पोलीस ठाण्याच्या कोठडीतून पळ काढला आहे. या घटनेमुळे [पोलिसांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. .ही घटना बुधवारी(दि. १७) पहाटे घडली आहे. 

चंद्रकांत लोखंडे आणि प्रवीण राऊत अशी पलायन केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर चोरीचे गुन्हे दाखल होते. भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सातारा महामार्गावरील कापूरव्होळ (ता. भोर) येथे पोलिसांच्या वेशात येऊन गोळीबार करुन दहशत निर्माण करत फिल्मी स्टाईलने ज्वेलर्सवर आरोपीनी दरोडा टाकला होता. त्यानंतर आरोपी चारचाकी गाडीतुन पळुन गेले होते.  या गुन्ह्यात शोध घेत असताना आरोपींनी पोलिसांवर गोळीबार केला होता. यात एक अधिकारी जखमी झाले होते. राजगड पोलिसांनी काही दिवसांपूर्वी वरील आरोपींना ताब्यात घेतले होते. गेल्या ७ दिवसांपासून सर्व आरोपींची भोर पोलीस ठाण्याच्या कोठडीत रवानगी करण्यात आली होती. याच ठिकाणी इतर गुन्ह्यातील आणखी चारजण आरोपी होते.

राजगड पोलीस ठाण्यातील ४ पोलिस कर्मचारी आरोपीच्या बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आले होते. कालच आरोपींना भोर न्यायालयात नेण्यात आले होते. मात्र बुधवारी पहाटे पोलिस कोठडीचे गज कापुन दोन आरोपींनी पोलिसांना चकवा देत कोठडीतून पोबारा केला आहे.त्यामुळे राजगड पोलिसांसमोर आता पुन्हा फरार झालेल्या आरोपींचा शोध घेणे आव्हान असणार आहे. 

Web Title: Shocking! Cinestyle escapes from police cell of two accused by cutting iron yard; The incident at bhor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.