खळबळजनक! बंडगार्डन ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याची राहत्या घरी आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2021 14:21 IST2021-02-27T14:02:32+5:302021-02-27T14:21:31+5:30
पोलीस दलासह शहरात एकच खळबळ उडाली..

खळबळजनक! बंडगार्डन ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याची राहत्या घरी आत्महत्या
पुणे : बंडगार्डन ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन शुक्रवारी (दि. २६) आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या आत्महत्येची माहिती समजताच पोलीस दलासह शहरात एकच खळबळ उडाली आहे. नाना हंडाळ (वय 40 रा.शिवाजीनगर पोलिस लाईन) असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
नाना हंडाळ हे शिवाजीनगर पोलीस लाईन येथे परिवारासोबत राहत होते. ते बंडगार्डन पोलीस ठाण्यात पोलीस नाईक पदावर कार्यरत होते. हंडाळ हे शुक्रवारी संध्याकाळी घरी आले. त्यावेळी त्यांच्या घरी कुणीच नव्हते. यानंतर त्यांनी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. यानंतर शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी हंडाळ यांना रुग्णालयात हलविले. परंतू, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.