धक्कादायक ! मारहाण केल्याने महिलेचा गर्भपात; कोथरूड पोलिसांत तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 07:25 PM2021-03-19T19:25:58+5:302021-03-19T19:26:17+5:30

आपल्याला मारहाण झाल्याने गर्भपात झाल्याचा आरोप पुण्यातील महिलेने केला आहे.

Shocking! Abortion of a women by beating; Filed a complaint with Kothrud police | धक्कादायक ! मारहाण केल्याने महिलेचा गर्भपात; कोथरूड पोलिसांत तक्रार दाखल

धक्कादायक ! मारहाण केल्याने महिलेचा गर्भपात; कोथरूड पोलिसांत तक्रार दाखल

googlenewsNext

पुणे : आपल्याला मारहाण झाल्याने गर्भपात झाल्याचा आरोप पुण्यातील महिलेने केला आहे. कोथरुड पोलिस स्टेशनमध्ये या संदर्भात तक्रार दाखल झाली आहे. २९ वर्षीय मनिषा भोसले आणि संतोष भोसले यांनी याबाबत तक्रार दिली आहे. पोलिसांनी याबाबत अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. 

१७ तारखेच्या दुपारी ही घटना घडली आहे. संतोष आणि मनिषा भोसले हे दोघे उसाचे गुऱ्हाळ चालवतात. कोथरुड येथील गणेशकुंज सोसायटी मध्ये ते गाडा लावतात. 

याठिकाणी गाडा का लावतो म्हणून या सोसायटीचे रहिवासी जयेश अनिरुद्ध कुलकर्णी आणि अनिरुद्ध उद्धव कुलकर्णी यांनी आपल्याला विचारणा केली. या दोघांनी आपल्याला व पत्नीला मारहाण केली. या मारहाणीमुळे पत्नीला ससून रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यातुन आपल्या पत्नीचा गर्भपात झाल्याचा आरोप भोसले यांनी केला आहे. कोथरुड पोलिसांनी या प्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.

Web Title: Shocking! Abortion of a women by beating; Filed a complaint with Kothrud police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.