शिवछत्रपती पुरस्कार विजेते फट यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:05 IST2021-02-05T05:05:14+5:302021-02-05T05:05:14+5:30

त्यांच्या नियुक्तीबद्दल एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आणि कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड, एमआयटी कॉलेज ऑफ मिटकॉमच्या संचालिका प्रा. डॉ. ...

Shivchhatrapati Award winner Phat felicitated | शिवछत्रपती पुरस्कार विजेते फट यांचा सत्कार

शिवछत्रपती पुरस्कार विजेते फट यांचा सत्कार

त्यांच्या नियुक्तीबद्दल एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आणि कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड, एमआयटी कॉलेज ऑफ मिटकॉमच्या संचालिका प्रा. डॉ. सुनीता मंगेश कराड, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अनंत चक्रदेव, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, डॉ. रामचंद्र पुजेरी यांच्यासह सर्व विभागाचे डीन, डायरेक्टर, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

पद्माकर फड यांनी १९८९ मध्ये चीन येथे झालेल्या आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करताना कांस्यपदक जिंकले आहे. तसेच भारत विरोध थायलँड बॉक्सिंग स्पर्धेतमध्ये सुवर्ण पदक जिंकले होते.१९८३ ते १९८८ दरम्यान झालेल्या बॉक्सिंगच्या राष्ट्रीय स्तरावरील कनिष्ठ आणि वरिष्ठ गटामध्ये त्यांनी ५ सुवर्णपदक आणि २ रौप्यपदक जिंकले असून महाराष्ट्र राज्याचे सलग ७ सुवर्ण पदक विजेते आहेत. तसेच त्यांनी राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत पंच म्हणून काम पाहिले आहेत. २००२ मध्ये डब्लिन, आयर्लंड येथे झालेल्या जागतिक सैन्य बॉक्सिंग चँपियनशिपसाठी त्यांनी भारतीय बॉक्सिंग संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणूनही काम पाहिले आहे.

Web Title: Shivchhatrapati Award winner Phat felicitated