शिवसेनेच्या वैद्यकीय कक्ष शहर प्रमुखाच्या वडिलांचे निधन; हडपसर येथील सह्याद्री मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाची तोडफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 13:45 IST2025-12-10T13:44:45+5:302025-12-10T13:45:07+5:30

रुग्णालयाच्या डॉक्टरांनी चुकीची ट्रीटमेंट देऊन माझ्या वडिलांना मारल्याचा आरोप शिवसेनेच्या वैद्यकीय कक्ष शहर प्रमुख अजय सपकाळ यांनी केला आहे

Shiv Sena's medical cell city chief's father passes away Sahyadri Multi Specialty Hospital in Hadapsar vandalized | शिवसेनेच्या वैद्यकीय कक्ष शहर प्रमुखाच्या वडिलांचे निधन; हडपसर येथील सह्याद्री मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाची तोडफोड

शिवसेनेच्या वैद्यकीय कक्ष शहर प्रमुखाच्या वडिलांचे निधन; हडपसर येथील सह्याद्री मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाची तोडफोड

पुणे : शिवसेनेचे वैद्यकीय कक्ष शहर प्रमुख अजय सपकाळ यांच्या वडिलांचं सह्याद्री रुग्णालयात निधन झाल्यानंतर 
या रुग्णालयाची तोडफोड करण्यात आली आहे. मी वैद्यकीय क्षेत्रात काम करत असल्याने त्याचा राग मनात धरून माझ्या वडिलांना या लोकांनी शिक्षा दिल्याचा आरोप सपकाळ यांनी केला आहे. जोपर्यंत हे रुग्णालय सील होत नाही, आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही असे म्हणत नातेवाईकांनी याठिकाणी आंदोलन सुरु केले आहे. 

अजय सपकाळ हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे वैद्यकीय कक्षाचे शहर प्रमुख आहेत. अजय सपकाळ यांच्या वडिलांचे 28 तारखेला साडेबारा वाजता अल्सरच ऑपरेशन होतं. त्यांनी सांगितले की, मी डॉक्टरांकडे माहिती घेऊन माझ्या वडिलांना रुग्णालयात ऍडमिट केलं होतं. दोन दिवसात व्यवस्थित होतील असं त्यांनी मला सांगितलं. 28 तारखेला ऑपरेशन झालं. त्यानंतर दोन दिवसात माझे वडील व्यवस्थित झाले. दोन दिवसात ते शुद्धीवर आले होते. त्यांचे व्हेंटिलेटर काढलेलं होतं. त्यांनी आमच्या सोबत गप्पा मारल्या. दोन दिवस ऑपरेशन झालेल्या माणसाला तेथील डॉक्टरांनी खुर्चीवर बसवलं आणि 20 ते 25 टाक्यांपैकी त्यांचे सहा-सात टाके त्यावेळेस तुटले. याबाबत डॉक्टरांनी आम्हाला कुठलीही कल्पना दिली नाही. त्यांच्या शरीरात इन्फेक्शन झाल असल्याचं सांगितलं आणि स्कॅन करायला घेऊन गेले. 

अल्सरच ऑपरेशन झालेल्या रुग्णाच्या फुफुसात पाणी झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं नाही. फक्त इन्फेक्शन आहे इतकच सांगत राहिले. डॉक्टरांनी चुकीची ट्रीटमेंट देऊन माझ्या वडिलांना मारल्याचा आरोप अजय सपकाळ यांनी केला आहे. शिंदे साहेब मी तुम्हाला सांगत आहे मी शिवसेनेचा शहर प्रमुख असतानाही तुमच्या कार्यकर्त्याला हा न्याय मिळत असेल तर सर्वसामान्यांचे काय हाल असतील. तोडफोड कोणी केली याची आम्हाला कल्पना नाही. पण सर्वसामान्य माणसाला रोज या रुग्णालयाच मारण्याचे काम आहे. हे लोक इन्शुरन्स चे पैसे उकळतात आणि माणसं मारतात. जोपर्यंत हे रुग्णालय सील होत नाही आणि आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाहीत. मी वैद्यकीय क्षेत्रात काम करतो याचा राग मनात धरून त्याची शिक्षा माझ्या वडिलांना या लोकांनी दिली आहे. 

Web Title : शिवसेना नेता के पिता की मृत्यु; पुणे में अस्पताल में तोड़फोड़

Web Summary : शिवसेना नेता अजय सपकाल के पिता की सह्याद्री अस्पताल में मृत्यु के बाद अस्पताल में तोड़फोड़ की गई। सपकाल ने चिकित्सा लापरवाही का आरोप लगाया और अस्पताल को बंद करने की मांग की। रिश्तेदार विरोध कर रहे हैं।

Web Title : Shiv Sena Leader's Father Dies; Hospital Vandalized in Pune

Web Summary : Following the death of Shiv Sena's Ajay Sapkal's father at Sahyadri Hospital, the hospital was vandalized. Sapkal alleges medical negligence led to his father's death and demands the hospital's closure until justice is served. Relatives are protesting at the site.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.