शिवसेनेचे थाळी वाजवून आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:11 IST2021-04-22T04:11:50+5:302021-04-22T04:11:50+5:30

शिवसेनेच्या वतीने नियमांचे पालन करीत घोले रोड क्षेत्रीय कार्यालयासमोर थाळी वाजवून आंदोलन करून विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. गोखलेनगर, ...

Shiv Sena's agitation by playing the plate | शिवसेनेचे थाळी वाजवून आंदोलन

शिवसेनेचे थाळी वाजवून आंदोलन

शिवसेनेच्या वतीने नियमांचे पालन करीत घोले रोड क्षेत्रीय कार्यालयासमोर थाळी वाजवून

आंदोलन करून विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

गोखलेनगर, जनवाडी, जनता वसाहत परिसरात नवीन लसीकरण

केंद्र सुरू करण्यात यावे, तसेच विलगीकरण कक्ष सुरू करण्यात यावा अशी

मागणी करण्यात आली. नीलज्योती सोसायटी सावित्रीबाई फुले सभागृह येथील

चाचण्यांचे रिपोर्ट वेळेवर येत नाहीत, तेथील रिपोर्ट ई - मेल किंवा व्हॉटसॲपवर

देण्याची व्यवस्था करण्यात यावी तसेच वरिल परिसरात नियमित औषध फवारणी

करण्यात यावी,, अशी मागणी निवेदनात करण्यात आलेली आहे.

शिवसेना शिवाजीनगर विभागप्रमुख प्रवीण डोंगरे, उमेश वाघ, अजय शिंदे,

संतोष ओरसे, मयूर पवार, तुफान ऊंडे, ओमकार डोंगरे, शुभम धोत्रे, रोहित कुसाळकर,

गणेश एडके, समीर जगताप आदी यावेळी उपस्थित होते.

Web Title: Shiv Sena's agitation by playing the plate