शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत भाजपात जाणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2022 15:09 IST2022-01-02T15:09:25+5:302022-01-02T15:09:37+5:30

शिवसेनेच्या आमदार तानाजी सावंत मागील काही दिवसांपासून पक्षावर नाराज आहे

Shiv Sena MLA Tanaji Sawant to join BJP | शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत भाजपात जाणार?

शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत भाजपात जाणार?

पुणे : शिवसेनेच्या आमदार तानाजी सावंत मागील काही दिवसांपासून पक्षावर नाराज आहे. त्यामुळे ते पक्ष बदलणार अशा चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. आज त्यांच्या पुण्यातील कात्रज येथील घरी भाजपचे नेते छत्रपती संभाजीराजे भोसले आले आहेत. त्या दोघांमध्ये मागील काही वेळापासून चर्चा सुरू आहे. त्यामुळे तानाजी सावंत हे आज नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तानाजी सावंत यांनी काल आपली पुढची राजकीय भूमिका घेणार असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे भाजपात प्रवेश करणार अशी चर्चा आहे. त्याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे यांच्यासोबत त्यांची बैठक सुरू आहे.. त्यानंतर अवघ्या काही वेळात ते आपला निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. 
 

Web Title: Shiv Sena MLA Tanaji Sawant to join BJP