हेल्मेटसक्तीला विरोध म्हणून शिवसेनेने काढली हेल्मेटची अंत्ययात्रा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 19:06 IST2019-01-03T18:31:04+5:302019-01-03T19:06:51+5:30
हेल्मेटसक्तीवरून सध्या पुण्यात रान उठलं असताना शिवसेनेने हडपसरमध्ये चक्क हेल्मेटची अंतयात्रा काढण्यात आली.

हेल्मेटसक्तीला विरोध म्हणून शिवसेनेने काढली हेल्मेटची अंत्ययात्रा
पुणे : हेल्मेटसक्तीवरून सध्या पुण्यात रान उठलं असताना शिवसेनेने हडपसरमध्ये चक्क हेल्मेटची अंतयात्रा काढण्यात आली. बांबूने तिरडी बांधून काढलेली ही अंत्ययात्रा उपस्थितांच्या चर्चेचा विषय ठरली होती.
एक जानेवारीपासून पुण्यात सुरु झालेली हेल्मेटसक्तीच्या कडक अंमलबजावणीमुळे शहरवासीयांचा विरोध सुरु झाला आहे. याचाच भाग म्हणून हेल्मेट विरोधी कृती समितीतर्फे हेल्मेट सक्तीच्या निर्णयाविरोधात आणि दंडवसुलीविरोधात पुण्यातील गांजवे चौक ते पोलीस आयुक्त कार्यालयावर सविनय कायदेभंग रॅली काढण्यात आली. तर दुसरीकडे हडपसरमध्ये माजी आमदार महादेव बाबर यांच्या नेतृत्वाखाली हेल्मेटची अंत्ययात्रा काढण्यात आली. या रॅलीत हडपसरचे नागरिक सहभागी झाले होते.