शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

‘राष्ट्रवादी’च्या खेळीनेच शितोळे बिनविरोध

By admin | Updated: March 9, 2015 00:50 IST

राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपाच्या उमेदवारीवर चिंचवड विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या आमदार लक्ष्मण जगताप

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपाच्या उमेदवारीवर चिंचवड विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या आमदार लक्ष्मण जगताप यांचा महापालिका राजकारणावरील प्रभाव अद्यापही कायम आहे. राष्ट्रवादीतील काही नगरसेवक आजही त्यांच्या मर्जीनुसारच काम करतात. त्यामुळे राष्ट्रवादीचे बहुमत असूनही आमदार जगताप गटाच्या प्रभावामुळे स्थायी समितीची निवडणूक अवघड जाऊ शकते, हे लक्षात घेऊन ज्याच्या नावाला आमदार जगताप गटाकडून विरोध होणार नाही, असा चेहरा म्हणून शितोळेनगर सांगवी प्रभागाचे नगरसेवक अतुल शितोळे यांचे नाव पुढे केले. राष्ट्रवादीने खेळलेल्या या खेळीमुळेच पहिली टर्म असूनही शितोळे यांना स्थायी सामती सभापतिपदी बिनविरोध निवडून येणे शक्य झाले. महापालिकेच्या राजकारणात पक्षीय राजकारणाबरोबर, पदाधिकाऱ्यांच्या गटातटाच्या राजकारणाला अधिक महत्त्व आले आले आहे. कधी चिंचवडचे, पिंपरीचे, तर कधी भोसरीचे आमदार यांच्या गटातटाभोवती हे राजकारण फिरलेले दिसून आले आहे. आपापल्या निकटवर्तीयांना महत्त्वाची पदे मिळावीत, यासाठी प्रत्येक वेळी आमदारांनी ताकद लावली आहे. ‘रोटेशन’ पद्धती अवलंबल्याप्रमाणे महत्त्वाच्या पदांच्या निवड केल्या आहेत. पिंपरी विधानसभा मतदारसंघातील जगदीश शेट्टी यांना स्थायी समिती सभापतिपदी संधी मिळाली. त्यानंतर चिंचवड मतदारसंघातील नवनाथ जगताप यांना आणि पाठोपाठ भोसरी विधानसभा मतदारसंघातून महेश लांडगे यांना संधी मिळाली. त्यांच्या रोटेशन पद्धतीनुसार या वेळी पिंपरी मतदारसंघातील कोणाला तरी संधी मिळणे अपेक्षित होते. माजी उपमहापौर डब्बू आसवाणी यांचे नाव चर्चेत होते. परंतु, विधानसभा, लोकसभा निवडणुकीनंतर महापालिकेच्या राजकारणाला मिळालेल्या कलाटणीमुळे रोटेशन पद्धतीही कोलमडली असून, नवी समीकरणे जुळवली गेली आहेत. आमदार जगताप यांना सुरुवातीच्या काळात राजकारणात सक्रिय होण्यास मदत करणारे ज्येष्ठ नेते नाना शितोळे हे अतुल शितोळे यांचे पिता. त्यांच्या निधनानंतर अतुल शितोळे यांचे छत्र हरपले. कोणी पाठीराखा नाही, या सहानुभूतीतून आमदार जगताप गटाकडून शितोळे यांच्या नावाला विरोध झाला नाही.स्थायी समिती सभापतिपदासाठी अतुल शितोळे यांचे नाव निश्चित झाल्यानंतर आमदार जगताप गटात नाराजी निर्माण झाली. जगतापविरोधी गटाने उघडपणे शितोळे यांना पाठिंबा दिला. आमदार जगताप यांचे कट्टर विरोधक नाना काटे, आझम पानसरे, प्रशांत शितोळे यांच्यासह खासदार श्रीरंग बारणे यांनी स्थायी समिती सभापतिपदी निवड झाल्याबद्दल सदिच्छा देण्यासाठी अतुल शितोळे यांची भेट घेतली.(प्रतिनिधी)