Shirur Nagar Parishad Election Result 2025: शिरूर नगरपरिषदेवर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ऐश्वर्या पाचर्णे विजयी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 12:02 IST2025-12-21T12:00:10+5:302025-12-21T12:02:18+5:30
Shirur Nagar Parishad Election Result 2025 राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अलका खंडरे यांचा पराभव केला. त्यांना 6874 मते मिळाली

Shirur Nagar Parishad Election Result 2025: शिरूर नगरपरिषदेवर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ऐश्वर्या पाचर्णे विजयी
शिरूर : शिरूर नगरपरिषद अध्यक्षपदी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ऐश्वर्या पाचर्णे 1925 मतांच्या आघाडीने विजयी झाल्या आहेत. त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अलका खंडरे यांचा पराभव केला. त्यांना 6874 मते मिळाली. तर भाजपच्या सुवर्णा लोळगे या तीन फेऱ्या पर्यंत दुसऱ्या स्थानी होत्या. परंतु आखेरिस तिसऱ्या स्थानी गेल्या.
24 जागांपैकी भाजपचे 11 नगरसेवक पदाचे उमेदवार निवडून आले राष्ट्रवादी अजित पवार गट - 7, राष्ट्रवादी शरद पवार गट - 5, अपक्ष 1 असे उमेदवार विजयी झाले आहेत. मागील निवडणुकीत उद्योजक प्रकाश धरीवाल यांच्या शिरूर शहर विकास आघाडी चे 21 पैकी 17, भाजपचे 2, लोकशाही क्रांती आघाडीचे 1 व अपक्ष 1 असे उमेदवार निवडून आले होते. भाजप वेगळता इतर पक्षानी निवडणूक लढावली नव्हती. विकास आघाडित सर्व एकत्र होते
चौथ्या शेवटच्या फेरी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व एकूण मते
1) एश्वर्या पाचर्णे (अजित पवार गट) - 8799
2) सुवर्णा लोळगे (भाजप) - 6742
3) अलका खंडरे (शरद पवार गट) - 6874
4) रोहिणी बनकर (शिवसेना शिंदे गट)- 390
5) वैशाली वखारे - 481
6) नोटा - 186