Shirish Maharaj More: काही दिवसापूर्वीच झाला होता साखरपुडा, तुकाराम महाराजांच्या वंशजाने का संपवले आयुष्य? सुसाईड नोटमध्ये नेमकं काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 15:14 IST2025-02-05T15:14:32+5:302025-02-05T15:14:58+5:30

Shirish More : संत तुकाराम महाराज यांचे वंशज शिरीष मोरे यांनी आज टोकाचं पाऊल उचलले. त्यांनी राहत्या घरी आत्महत्या केल्याची बातमी समोर आली.

Shirish Maharaj More engagement ceremony had taken place a few days ago, why did the descendant of Tukaram Maharaj end his life? What exactly is in the note? | Shirish Maharaj More: काही दिवसापूर्वीच झाला होता साखरपुडा, तुकाराम महाराजांच्या वंशजाने का संपवले आयुष्य? सुसाईड नोटमध्ये नेमकं काय?

Shirish Maharaj More: काही दिवसापूर्वीच झाला होता साखरपुडा, तुकाराम महाराजांच्या वंशजाने का संपवले आयुष्य? सुसाईड नोटमध्ये नेमकं काय?

Shirish More ( Marathi News ) : संत तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज शिरीष महाराज यांनी आज राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्यांच्या आत्महत्येने राज्यभरातून हळहळ व्यक्त होत आहे.  मंगळवारी रात्री शिरीष मोरे जेवणानंतर आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेले होते. पण, सकाळी उशीर होऊनही ते खोलीतून बाहेर आले नाहीत. कुटुंबीयांनी त्यांना बोलावण्याचा प्रयत्न केला. पण, आतून काही प्रतिसाद आला नाही. यामुळे कुटुंबीयांनी दरवाजा तोडला. यावेळी कुटुंबीयांना शिरीज महाराज यांनी गळफास घेतल्याचे दिसले. या घटनेचा तपास देहूरोड पोलीस करत आहेत. शिरीष महाराज यांच्या जवळ एक सुसाईड नोट सापडल्याची माहिती समोर आली आहे. 

Shirish Maharaj More: संत तुकाराम महाराजांच्या ११ व्या वंशजाने राहत्या घरी आयुष्य संपवलं; देहूत शोककळा

शिरीष महाराज हे संत तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज आहेत. ते उदरनिर्वाहसाठी प्रवचन आणि कीर्तन करत होते. त्यांचे निगडी येथे इडली उपहारगृह होते. मात्र, यामधून त्यांना फारसे उत्पन्न मिळत नव्हते. यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती. शिरीष महाराज मोरे हे फक्त ३० वर्षाचे होते. एप्रिल महिन्यात त्यांचे लग्न होणार होते. याआधीच त्यांनी टोकाचे पाऊल उचलले आहे. 

देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार,  प्राथमिकदृष्ट्या आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याचे कळत आहे. या घटनेचा अधिक तपास देहूरोड पोलीस करत आहेत. आज दुपारी चार वाजता अंत्यस्कार करण्यात येणार आहेत.  

त्यांचे निगडी येथे इडली उपहारगृह देखील होते. मात्र, यामधून त्यांना फारसे उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती. येत्या 20 फेब्रुवारी रोजी त्यांचा विवाह पार पडणार होता. मात्र, हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांनी आत्महत्या केली असल्याचे समोर आले आहे. सुसाईड नोटमध्ये आर्थिक परिस्थितीचे कारण दिल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title: Shirish Maharaj More engagement ceremony had taken place a few days ago, why did the descendant of Tukaram Maharaj end his life? What exactly is in the note?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.