शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

शिक्रापूर पोलिसांची वाहतूककोंडीप्रश्नी बैठक

By admin | Updated: June 18, 2015 22:39 IST

पुणे-नगर रोडवरील शिक्रापूर येथे होणाऱ्या वाहतूककोंडीचा प्रश्न वाढत असताना विविध संघटनेने येथे सिग्नल बसविण्यासाठी

शिक्रापूर : पुणे-नगर रोडवरील शिक्रापूर येथे होणाऱ्या वाहतूककोंडीचा प्रश्न वाढत असताना विविध संघटनेने येथे सिग्नल बसविण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर येथील पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली असून, वाहतूक समस्या सोडविण्यासाठी शिक्रापूर पोलिसांनी रोडलगतच्या व्यापाऱ्यांची बैठक घेतली. तर वाहतूक नियमनासाठी मुख्यालयाने आठ अतिरिक्त पोलीस कर्मचारी शिक्रापूर पोलीस ठाण्याला दिले.पुणे-नगर रोडवर शिक्रापूर पोलीस ठाण्यांतर्गत शिक्रापूर-चाकण चौक, शिक्रापूर-पाबळ चौक, कोरेगाव-केंदूर चौक, कोंढापुरी, सणसवाडी आदी भागांत दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होते. पोलीस स्टेशनपासूनच अर्धा किमी अंतरापर्यंत दररोज ट्रॅफिक जॅमला सुरुवात होत असते. मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण झालेल्या शिक्रापूर परिसरात कामगारवर्ग त्रासला आहे. मागील वर्षी कंपन्यांनी वॉर्डनची नेमणूक केली होती. तात्पुरती उपाययोजना होऊन पुन्हा जैसी थी स्थिती झाली. यावर उपाययोजना आखण्यासाठी शिक्रापूर पोलिसांनी व्यापाऱ्यांची बैठक घेतली. गावातील रस्त्याच्या कडेला लावली जाणारी वाहने बेशिस्तपणे लावू नये. तसेच व्यापाऱ्यांनी ग्राहकांना गाड्या योग्य पद्धतीने लावण्याच्या सूचना कराव्यात, असे पोलिसांनी सांगितले. या वेळी पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ, अनिल जगताप, संदीप जगदाळे, शिक्रापूर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक शहाणे, सचिव लद्दाराम पटेल, निखिल साकोरे, बाबा चव्हाण, उमेश भुजबळ, हर्षल पाबळे, रामदास सातकर, किरण पुंडे, कामेश थोरवे, जितेंद्र थोरवे उपस्थित होते.