शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

दरोडा टाकणाऱ्या शिकलकरी टोळीला अटक, तीन लाखांचा मुद्देमाल केला जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 15:42 IST

पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या होते तयारीत

ठळक मुद्देत्यांच्याकडून ७ गुन्हे उघडकीस, मोक्का कारवाईतील आरोपींची होती सक्रिय टोळी

पुणे: पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत जाणार्‍या शिकलकरी टोळीतील चौघांना गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने अटक केली. त्यांच्याकडून ७ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे.

टोळीप्रमुख तिलकसिंग गब्बरसिंग टाक (वय २८, रा. रामटेकडी) निशांत ऊर्फ ब्लॅक अनिल ननावरे (वय २३, रा. महंमदवाडी), सुनील प्रकाश गायकवाड (वय २३ रा. रामटेकडी) गणेश राजेंद्र शिवाडकर (वय २१ रा. रामटेकडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचे साथीदार किशोर प्रशांत गायकवाड आणि आकाश गणपत माने पळून गेले आहेत.

मोक्का कारवाई केलेले तिलकसिंग आणि निशांत ऊर्फ ब्लॅक अनिल ननावरे हे त्यांच्या साथीदारांसह उरळी कांचन परिसरातील डाळींब गावानजीक कॅनॉल रोडने येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक गुंगा जगताप यांना मिळाली. त्यानुसार दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल पंधरकर यांच्या सूचनेनुसार गुंगा जगताप व त्यांच्या पथकाने कॅनॉल रोडवर गाडी बिघडली असल्याचा बहाणा करुन सापळा रचला. मोटारीतून आलेल्या तिलकसिंग व इतरांना मदतीचा बहाणा करुन थांबवले. तेव्हा पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्यातील दोघे पळून गेले होते.

या टोळीकडून वाहनचोरीचे ४ व घरफोडीचे ३ असे ७ गुन्हे उघडकीस आणले आहेत. घरफोडीच्या गुन्ह्यातील दोन तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या व २ लाख ३० हजार रुपयांच्या ४ कार असा माल जप्त केला आहे. तसेच ताब्यात घेतले त्यावेळी एक कार व एक गावठी पिस्तुल असा एकूण ३ लाख ५० हजार ३६० रुपयांचा माल जप्त केला आहे. तिलकसिंग गब्बरसिंग टाक याच्याविरुद्ध दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, वाहनचोरी असे ६७ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. निशांत ऊर्फ ब्लॅक अनिल ननावरे याच्या विरुद्ध ८ गुन्हे दाखल आहेत. सुनिल ऊर्फ बावड्या प्रकाश गायकवाड याच्याविरुद्ध  ६ गुन्हे दाखल आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसuruli kanchanउरुळी कांचनArrestअटक