मुंबईतील मराठा बांधवांसाठी बारामतीतून शिदोरी; १० हजार लोकांसाठी भाकरी, ठेचा, शेंगदाणा चटणी, लोणचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 20:46 IST2025-08-30T20:45:54+5:302025-08-30T20:46:22+5:30

एक घास माणुसकीचा एक हात मदतीचा, या अंतर्गत समाजबांधवांना आज दुपारी सोशल मिडीयावर आवाहन करण्यात आले. त्या आवाहनाला भरभरुन प्रतिसाद मिळाला

Shidori from Baramati for Maratha brothers in Mumbai; Bread, rice, peanut chutney, pickles for 10 thousand people | मुंबईतील मराठा बांधवांसाठी बारामतीतून शिदोरी; १० हजार लोकांसाठी भाकरी, ठेचा, शेंगदाणा चटणी, लोणचे

मुंबईतील मराठा बांधवांसाठी बारामतीतून शिदोरी; १० हजार लोकांसाठी भाकरी, ठेचा, शेंगदाणा चटणी, लोणचे

बारामती: मुंबई येथे सुरु असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनासाठी बारामती तालुक्यात एक एक शिदोरी उपक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत मुंबइ येथील आंदोलनाच्या ठीकाणी उपस्थित असलेल्या समाजबांधवांसाठी भाकरी, ठेचा, शेंगदाणा चटणी, लोणचे आदी अन्नपदार्थ मुंबइला पाठविण्यात आले. बारामती येथील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने दहा हजार लोकांसाठी आवश्यक जेवण भाकरी ठेचा आदी साहित्य तसेच १० हजार पाण्याच्या बाटल्या पाठविण्यात आल्या आहेत. मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरु असेपर्यंत बारामती मधून ही शिदोरी पाठविली जाणार आहे.

जिजाऊ भवन येथे शहर आणि तालुक्यातील समाजबांधवांनी अन्नपदार्थ आणुन जमा केले. यावेळी जमा झालेल्या अन्नाची शिदोरीचे पॅकींग करण्यासाठी महिलांनी एकत्र येत यंत्रणा राबविली. तसेच समाजबांधवांनी एकत्र येत सहित्य नियोजनबध्द जमा केले. एक घास माणुसकीचा एक हात मदतीचा, या अंतर्गत समाजबांधवांना आज दुपारी सोशल मिडीयावर आवाहन करण्यात आले होते. त्या आवाहनाला समाजबांधवांनी भरभरुन प्रतिसाद दिला. मुंबई येथील समाजबांधवांसाठी शनिवारी(दि ३०) सायंकाळी स्वतंंत्र शिदोरी पाठविण्यात आली. रविवारी(दि ३१) देखील शिदोरी स्वीकारण्यात येणार आहे.

Web Title: Shidori from Baramati for Maratha brothers in Mumbai; Bread, rice, peanut chutney, pickles for 10 thousand people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.