शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
3
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
4
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
5
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
6
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
7
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
8
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
9
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
10
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
11
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
12
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
13
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
14
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
15
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
16
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
17
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
18
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
19
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
20
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

दररोज मुंबईला वाहतुक करणाऱ्या ड्रायव्हर पतीला सोडुन पत्नीने गाठले माहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 6:44 PM

लहान बाळाला कोरोना संसर्ग होण्याच्या भीतीने आई आक्रमक 

ठळक मुद्देतहसिलदार सोनाली मेटकरी यांनी पुणे, मुंबईहुन येणाऱ्यांना क्वारंटाइन करण्याचे काढले आदेश

निमगाव केतकी: येथील तरकारी वाहतुक करणाऱ्या पिक - अप ड्रायव्हर जादा पैसे मिळत असल्याने दररोज मुंबई या ठिकाणी तरकारी भाजीपाला घेऊन जात आहेत.मात्र, सध्या रोज मुंबईला जाणाऱ्या अशाच एका चालकाची परिसरात चर्चा रंगली आहे. हा चालक मुंबई  हुन आल्यानंतर देखील  होमकोरंटाइन होत नव्हता.या स्थितीत त्यांच्यापासुन आपल्या लहान बाळाच्या जीवास धोका निर्माण होण्याच्या भीतीने आक्रमक पत्नीने चालक पतीला सोडुन लहानबाळासह माहेरी गाठले आहे मुंबई - पुणे येथे तरकारी वाहतुक करणाऱ्या पासून कोरोनाचा प्रसार होऊन वस्तीवर व गावात हाहाकार माजण्याची भीती व्यक्त करत आहेत. निमगाव केतकी गाव हे डाळिंब, द्राक्षे, पेरु, तरकारी, भाजीपाल्यासाठी प्रसिद्धआहे. दररोज ३५ ते ४० पिकअप तरकारी दररोज लॉकडाऊनच्या काळात पण पुणे ,मुंबई , सोलापुर या भागात जातात. त्यामध्ये पिक - अप  चालक देखील अपवाद ठरला नाही. कोरोना प्रतिबंधक नियमाकडे देखील त्या चालकाने दुर्लक्ष केले. पत्नी आणि कुटुंबाचा सल्ला ऐकला नाही. मात्र, पतीच्या पैशाच्या प्रेमापोटी आपल्याला आणि आपल्या लहानग्याला जीव गमवावा लागेल. ममत्व जागे झालेली पत्नी आक्रमक झाली.या पत्नीने घरात या विषयावर भांडण करुन माहेर गाठल्याचे समजते.  सध्या मुंबई, पुणे, सोलापूर येथील वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाने या भागात तरकारी वाहतुक चालकाबाबत बाबत मनात भीतीचे वातावरण आहे. ग्रामस्थांनी तहसीलदार यांच्याकडे या दररोज वाहतूक करणाऱ्यांना क्वारंटाइन करण्याची मागणी केली होती. तहसिलदार सोनाली मेटकरी यांनी पुणे, मुंबईहुन येणाऱ्यांना क्वारंटाइन  करण्याचे आदेश काढले आहेत. हे आदेश फक्त बाहेरुन येणाऱ्या नागरिकांसाठीच आहेत. 

टॅग्स :BaramatiबारामतीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसvegetableभाज्याPuneपुणेMumbaiमुंबई