‘ती’ साकारतेय सुबक गणेशमूर्ती, वर्षभरात १५०० मूर्तींची विक्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2018 00:42 IST2018-08-15T00:41:51+5:302018-08-15T00:42:40+5:30
नगर-कल्याण महामार्गावरील डिंंगोरे येथील पदवीधर महिला अरुणा संतोष सोनवणे गेल्या १८ वर्षांपासून श्रीगणेशाच्या सुबक मूर्ती निर्माण करीत आहेत. स्वत:च्या कारखान्यात दरवर्षी सुमारे १५०० गणेशमूर्तींची त्या विक्री करतात.

‘ती’ साकारतेय सुबक गणेशमूर्ती, वर्षभरात १५०० मूर्तींची विक्री
ओतूर : नगर-कल्याण महामार्गावरील डिंंगोरे येथील पदवीधर महिला अरुणा संतोष सोनवणे गेल्या १८ वर्षांपासून श्रीगणेशाच्या सुबक मूर्ती निर्माण करीत आहेत. स्वत:च्या कारखान्यात दरवर्षी सुमारे १५०० गणेशमूर्तींची त्या विक्री करतात.
अरुणा सोनवणे या कला शाखेच्या पदवीधर असून पदवीनंतर नोकरीच्या मागे न लागता त्यांनी कुटुंबाच्या गणेशमूर्ती बनविण्याच्या पारंपरिक व्यवसायात स्वत:ला झोकून दिले. स्वत:चा कारखानाही सुरू केला आहे. त्यांचे पती संतोष सोनवणे हे आर्ट मास्टर असून ओतूर येथील चैतन्य विद्यालयात कला शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध गणेश मूर्ती व साचे बनविले जातात. अरुणा सोनवणे यांच्या कारखान्यात दगडूशेठ हलवाई, लालबागचा राजा , चिंतामणी, पौराणिक प्रसंगावर आधारित गणेशमूर्ती बनविल्या आहेत. दगडूशेठ हलवाई व लालबागचा राजा यांना मागणी आहे.
कारखान्यात सहा इंच ते पाच फूट उंचीच्या गणेशमूर्ती बनविल्या जातात.
कामासाठी कायमस्वरूपी चार ते पाच महिला आहेत.काही जणी कुशल कारागीर झाल्या आहेत.
नवीन महिलांनाही कलाप्रशिक्षण.
मूर्ती आकर्षक, सुबक, कलाकुसरपूर्ण, डायमंड वर्क केलेल्या असतात.
मुर्तींना मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे जिल्ह्यांतून मागणी.