शहरं
Join us  
Trending Stories
1
जिंकलो रे राजेहो ! उपोषण सोडताना मनोज जरांगे यांचे आनंदोद्गार; आंदोलकांनी उधळला गुलाल
2
टीम इंडियाच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी अर्ज करा! BCCIने मागविल्या बोली; अंतिम तारीखही दिली
3
कळा वाढल्याने भररस्त्यात रुग्णवाहिकेतच केली प्रसूती; डॉक्टरांच्या निर्णयामुळे मायलेक सुखरूप
4
माझ्या आईबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना बिहारची जनता माफ करणार नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
एलिफंटा, न्हावा बेटावर पर्यटनासाठी मास्टर प्लॅनिंग; सिडको करणार विकास; ग्रामस्थ संभ्रमात
6
दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे SCO मध्ये पाकिस्तानला खडेबोल
7
जम्मू काश्मीर: पूंछ जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला !
8
अफगाणिस्तानच्या पूर्व भागात रात्री ६ रिक्टर स्केल क्षमतेचा तीव्र भूकंप; ८०० लोकांचा मृत्यू
9
मराठा आरक्षण: सरकारचा मसुदा तयार; लवकरच निर्णय; मुख्यमंत्री अन् उपसमितीची संयुक्त बैठक
10
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
11
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
12
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
13
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
14
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
15
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
16
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
17
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
18
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
19
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
20
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?

शशांक, लता, करिश्माला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; सासू, नणंदेचा लगेचच जामिनासाठी अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 17:26 IST

लता आणि करिष्मा हगवणे यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्यांनी लगेचच जामिनासाठी अर्ज केल्याची माहिती समोर आली आहे

पुणे : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात सासू लता हगवणे, ननंद करिष्मा हगवणे आणि पती शशांक हगवणे यांना २८ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलिसांनी पुन्हा एकदा न्यायालयात हजर केलं असून शशांक, सासू, नणंद यांना एक दिवसाची तर सासरा दीराला ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आज पुन्हा न्यायालयात हजर केले असता शशांक हगवणे, लता हगवणे आणि करिष्मा हगवणे यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात  आली आहे. या सुनावणीनंतर त्या लता आणि करिष्मा यांनी जामिनासाठी अर्ज केल्याची माहिती समोर आली आहे. 

पोलिसांनी आजच्या सुनावणीत पोलीस कोठडीची मागणी केली नाही. गरज पडल्यास आम्ही कोठडी मागू असे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले आहे. त्यानुसार या तिघांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. ती मिळताच सासू आणि नणंद दोघींनी जामीन अर्ज दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. हुंड्यासाठी छळ करून वैष्णवी हगवणे हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटकेत असलेला पती शशांक राजेंद्र हगवणे (२७), सासू लता राजेंद्र हगवणे (५४), नणंद करिष्मा राजेंद्र हगवणे (३१), सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे (६३) आणि दीर सुशील राजेंद्र हगवणे (२७) यांना आता न्यायालयीन आणि पोलीस कोठडी देण्यात आली आहे. 

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात पती शशांक आणि दीर सुशील हगवणे या बंधूनी त्यांची आई लता आणि बहीण करिष्मा यांचे मोबाईल फरार आरोपी नीलेश चव्हाण याच्या मदतीने लंपास केले आहेत. या मोबाईलमध्ये शशांक याने पत्नी वैष्णवी यांना मारहाण केल्याचे आणि आरोपींमधील संभाषणाचे पुरावे असू शकतात, अशी माहिती पोलिसांनी बुधवारी न्यायालयाला दिली. तर हगवणे यांच्या वकिलांनी वैष्णवी यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत एखाद्या नवऱ्याने बायकोला चार कानाखाली मारल्या म्हणजे छळ होत नाही, असा अजब युक्तिवाद केला. वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत नको ते चॅट सुरु होते. ते पकडले होते. त्याची माहिती आम्हाला हवी आहे. वैष्णवीची टेंडंसी सुसाईड करण्याची होती. तीचे एका व्यक्तीसोबतचे चॅट पकडले गेले होते. त्यातुनच तिने अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केला. एकदा रॅट पॉइझन घेऊन आणि एकदा गाडीतुन उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न केला, असेही वकिलांनी सांगितले.

तिघांना न्यायालयीन कोठडी, दोघांना पोलीस कोठडी 

न्यायालयाने कालच्या युक्तिवादानंतर शशांक, लता आणि करिष्मा हगवणे यांच्या पोलिस कोठडीत एक दिवस तर राजेंद्र आणि सुशील यांच्या पोलिस कोठडीत ३१ मेपर्यंत वाढ केली होती. आज शशांक, लता आणि करिष्मा हगवणे यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर राजेंद्र आणि सुशील यांच्या पोलीस कोठडीचा निर्णय ३१  मे ला होणार आहे. 

यांना मिळाला जामीन..

फरार झालेला दीर आणि सासरा यांना आश्रय दिल्याप्रकरणी अटक केलेल्या प्रीतम वीरकुमार पाटील (४७, रा. कोगनोळी, ता. चिकोडी, जि. बेळगाव, कर्नाटक), मोहन ऊर्फ बंडू उत्तम भेगडे (६०, रा. वडगाव मावळ), बंडू लक्ष्मण फाटक (५५, रा. लोणावळा), अमोल विजय जाधव (३५, रा. पुसेगाव, ता. खटाव, जि. सातारा), राहुल दशरथ जाधव (४५, रा. पुसेगाव, ता. खटाव, जि. सातारा) यांना जामीन मंजूर झाला आहे.

टॅग्स :PuneपुणेVaishnavi Hagawane Death Caseवैष्णवी हगवणेCourtन्यायालयPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड