Sharad Pawar Health Update: शरद पवार यांची प्रकृती स्थिर; प्रकृतीत सुधारणा, रुबी हॉल क्लिनिकच्या डॉक्टरांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 11:23 IST2026-02-10T11:22:09+5:302026-02-10T11:23:09+5:30

Sharad Pawar Health Latest Update: खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना अद्याप निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे, ठराविक वैद्यकीय प्रोटोकॉलनुसार त्यांच्यावर उपचार सुरू असून सर्व तपासण्या नियमितपणे करण्यात येत आहेत.

Sharad Pawar's condition is stable; improvement in health, information from Ruby Hall Clinic doctors | Sharad Pawar Health Update: शरद पवार यांची प्रकृती स्थिर; प्रकृतीत सुधारणा, रुबी हॉल क्लिनिकच्या डॉक्टरांची माहिती

Sharad Pawar Health Update: शरद पवार यांची प्रकृती स्थिर; प्रकृतीत सुधारणा, रुबी हॉल क्लिनिकच्या डॉक्टरांची माहिती

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यात चांगली सुधारणा होत असल्याची माहिती रुबी हॉल क्लिनिकचे फिजिशियन व विश्वस्त डॉ. सायमन ग्रँट यांनी दिली. पवार यांचे सर्व जीवनसत्त्वीय निकष (व्हायटल पॅरामिटर्स) सामान्य मर्यादेत असून त्यांची एकूण प्रकृती स्थिर आणि सुधारत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

रुग्णालयात दाखल होताना जाणवलेला सौम्य त्रास उपचारांमुळे आता कमी झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना अद्याप निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. रुबी हॉल क्लिनिकच्या ठराविक वैद्यकीय प्रोटोकॉलनुसार त्यांच्यावर उपचार सुरू असून सर्व तपासण्या नियमितपणे करण्यात येत आहेत.
पुढील उपचारांबाबतचे निर्णय पवार यांच्या प्रकृतीतील प्रगती लक्षात घेऊन घेण्यात येणार असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. दरम्यान, रुग्णालयातील नियमित रुग्णसेवेत कोणताही अडथळा येऊ नये यासाठी पक्षाचे कार्यकर्ते व हितचिंतकांनी रुग्णालय परिसरात गर्दी करू नये, असे आवाहन रुबी हॉल क्लिनिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान राष्ट्रवादीचे (शरद पवार) अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांना श्वास घेण्यात त्रास होत असल्याच्या कारणास्तव सोमवारी (दि. ९) दुपारी साडेतीनच्या सुमारास पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले. यावेळी रुबीचे संचालक डॉ. सायमन ग्रॅण्ट यांच्या मार्गदर्शनाखाली पवार यांची प्राथमिक तपासणी करण्यात आली. प्राथमिक तपासणीत काही चाचण्या सामान्य असल्याचे निदर्शनास आले असून, शरद पवार यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. 

Web Title : शरद पवार की तबीयत स्थिर, सुधार: रूबी हॉल क्लिनिक के डॉक्टर

Web Summary : डॉ. साइमन ग्रांट के अनुसार शरद पवार की हालत स्थिर है और सुधार हो रहा है। महत्वपूर्ण मापदंड सामान्य हैं। एहतियात के तौर पर वे निगरानी में हैं, इलाज के लिए अच्छी प्रतिक्रिया दे रहे हैं। समर्थकों से अस्पताल में भीड़ न लगाने का अनुरोध किया गया है।

Web Title : Sharad Pawar's health stable, improving: Ruby Hall Clinic Doctor

Web Summary : Sharad Pawar's condition is stable and improving, according to Dr. Simon Grant. Vital parameters are normal. He's under observation as a precaution, responding well to treatment. Supporters are asked to avoid crowding the hospital.