अजितदादांच्या रोड शो नंतर शरद पवार यांची पुण्यात २७ ऑक्टोबरला जाहीर सभा

By राजू हिंगे | Updated: September 17, 2023 18:56 IST2023-09-17T18:56:15+5:302023-09-17T18:56:26+5:30

पुण्यात शरद पवारांचा गट आता अजित पवारांच्या गटाशी दोन हात करायला तयार झाल्याचं बघायला मिळतय

Sharad Pawar public meeting in Pune on October 27 | अजितदादांच्या रोड शो नंतर शरद पवार यांची पुण्यात २७ ऑक्टोबरला जाहीर सभा

अजितदादांच्या रोड शो नंतर शरद पवार यांची पुण्यात २७ ऑक्टोबरला जाहीर सभा

पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात रोड शो करून ताकदीचे प्रदर्शन केल आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पुणे दौऱ्यावर असुन त्यांची जाहीर सभा होणार आहे. येत्या २७ ऑक्टोबरला गणेश कला क्रिडा रंगमंच येथे ही सभा होणार आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसापुर्वी पुण्यात रोड शो केला होता. या रोड शो च्या माध्यमातुन ताकदीचे प्रदर्शन केले होते. त्यानंतर आता गणेश कला क्रिडा रंगमंच येथे येत्या २७ ऑक्टोबरला शरद पवार यांची सभा होणार आहे अशी माहिती शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली आहे.

येत्या काहीच दिवसांत पुण्यातील शहराध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची बैठक होईल. या बैठकीत जाहीर सभेचं पुढील नियोजन करण्यात येणार आहे. पुण्यात शरद पवारांचा गट आता अजित पवारांच्या गटाशी दोन हात करायला तयार झाल्याचं बघायला मिळत आहे. या जाहीर सभेत शरद पवार हे अजित पवारांवर निशाणा साधणार का? कि ते पक्षबांधणीचा प्रयत्न कऱणार, हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 

Web Title: Sharad Pawar public meeting in Pune on October 27