Sharad Pawar: शरद पवार यांना २ दिवसाच्या उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज; प्रकृती उत्तम, डॉक्टरांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 10:33 IST2026-02-25T10:32:52+5:302026-02-25T10:33:15+5:30

शरद पवार यांना पुढील दोन ते तीन दिवस विश्रांती घ्यायचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे

Sharad Pawar discharged from hospital after 2 days of treatment; condition good, doctor says | Sharad Pawar: शरद पवार यांना २ दिवसाच्या उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज; प्रकृती उत्तम, डॉक्टरांची माहिती

Sharad Pawar: शरद पवार यांना २ दिवसाच्या उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज; प्रकृती उत्तम, डॉक्टरांची माहिती

पुणे : ज्येष्ठ नेते शरद पवार यांना सौम्य डिहायड्रेशन झाल्याच्या तक्रारीमुळे रविवारी (दि. २२) शहरातील रूबी हॉल क्लिनिक येथे दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांच्या उपचारानंतर आज त्यांना रुबी हॉल रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांची प्रकृती आता चांगली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. दोन दिवस त्यांना द्रवपदार्थ दिले जात होते. 

त्यांना छातीत इन्फेक्शन झाल्याने काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी ५ दिवस त्यांच्यावर उपचार करण्यात आले. पुन्हा रविवारी त्रास झाल्याने त्यांना रुबी हॉल मध्ये आणण्यात आले. शरद पवार यांना रविवारी सौम्य निर्जलीकरणाचा त्रास जाणवल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती स्थिर होती. आवश्यक ते उपचार करून पुढील दोन दिवस त्यांना रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. त्यानंतर आता रुग्णालयातून सोडण्यात आले आहे.

पवार यांच्या प्रकृतीबाबत कोणतीही गंभीर बाब नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले असून, समर्थकांनी चिंता करू नये, असेही सांगण्यात आले आहे. दरम्यान, पवार यांच्या प्रकृतीची माहिती समजताच विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. दोन दिवसांत प्रकृतीत पूर्ण सुधारणा होऊन ते घरी परतले आहेत.

शरद पवारांची प्रकृती उत्तम आहे. त्यांना आज हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला असून ते आता मुंबईला गेले आहेत. पुढील दोन ते तीन दिवस त्यांना विश्रांती घ्यायचा सल्ला आम्ही दिला आहे. त्यांना डिहायड्रेशन इन्फेक्शन झालं होतं. त्यावर आम्ही उपचार केले. त्यांना सलाईन लावले. पंधरा दिवसानंतर पुन्हा त्यांना फॉलोअप साठी बोलवण्यात आलं आहे. पुढील तीन दिवसानंतर ते कामाला सुरुवात करतील. रेगुलर रुटीन प्रमाणे त्यांनी गोळ्या घ्यावेत आराम करावा असे डॉक्टरांनी सांगितले आहे. 

Web Title : शरद पवार इलाज के बाद अस्पताल से डिस्चार्ज; स्वास्थ्य स्थिर

Web Summary : शरद पवार को हल्के डिहाइड्रेशन के इलाज के बाद रूबी हॉल क्लिनिक से छुट्टी मिली। डॉक्टरों ने बताया कि उनका स्वास्थ्य अच्छा और स्थिर है। उन्हें कुछ दिन आराम करने की सलाह दी गई है और पंद्रह दिनों में फॉलो-अप के लिए बुलाया गया है।

Web Title : Sharad Pawar Discharged After Treatment; Health Stable, Doctors Say

Web Summary : Sharad Pawar was discharged from Ruby Hall Clinic after two days of treatment for mild dehydration. Doctors report his health is good and stable. He will rest for a few days before resuming work. He has been advised a follow-up visit in fifteen days.