शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

"जिथे आमचा देव नाही तिथे नमस्कारही नाही, आम्हीही राजीनामा देतोय" पुणे NCP शहराध्यक्षांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2023 16:29 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ट्विट करत माहिती दिली.....

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवारांनी (sharad pawar resign) पक्षाचे अध्यक्षपद सोडणार असल्याची घोषणा केली. मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये 'लोक माझा सांगाती' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ही निवृत्तीची घोषणा केली. पवारांच्या घोषणेनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. राज्यभरातील कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे पदाधिकारी, नेते शरद पवारांनी त्यांचा निर्णय मागे घ्यावा यासाठी प्रयत्न करत आहेत. पुण्यातील पदाधिकाऱ्यांनीही शरद पवारांच्या या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचेपुणे शहराचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ट्विट करत माहिती दिली. 

जगताप ट्विट करत म्हणाले, "कितीही इच्छा झाली तरी किमान भक्तांच्या श्रद्धेसाठी देवाला देवपण सोडता येत नाही, अगदी तसंच पवार साहेबांनीही अध्यक्षपद सोडू नये. साहेबांनी आपली भूमिका न बदलल्यास माझ्यासह पुणे शहर कार्यकारणीतील तमाम सदस्य राजीनामा देत आहोत, जिथे आमचा देव नाही तिथे आमचा नमस्कारही नाही." पुण्यातील राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनीही शरद पवारांच्या निवृत्तीला विरोध दर्शविला आहे.

आज सकाळी मुंबईत झालेल्या कार्यक्रमात शरद पवार म्हणाले, यापुढे मी तीनच वर्ष राजकारणात राहणार आहे. राष्ट्रवादीच्या पुढच्या अध्यक्षपदासाठी नवीन समिती स्थापन करणार आहोत. नवीन समिती अध्यक्षपदाचा निर्णयही लवकर घेण्यात येईल, असंही शरद पवार म्हणाले. यावेळी सभागृहातील कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेण्याची मागणी केली. सभागृहात शरद पवार यांच्या घोषणा सुरू होत्या. यावळी बोलताना शरद पवार यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिल्या.

बारामतीतही राष्ट्रवादी काँग्रेस भवनसह शहरात सर्वत्र शांतता पसरल्याचे चित्र पहावयास मिळाले. यावेळी बहुतांश पदाधिकारी धक्क्यातून न सावरल्याने याबाबत प्रतिक्रिया देण्यास असमर्थता दर्शविली. पुणे शहरातील राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी रस्त्यावर बसून आंदोलनही केले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसPuneपुणेSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवार