शरद पवार यांना सरकारबरोबर येण्याचे घातले साकडे; हसन मुश्रीफ यांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 10:05 IST2023-08-17T10:04:48+5:302023-08-17T10:05:06+5:30

राज्याच्या विकासासाठी आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो आहोत

Sharad Pawar asked to come with the government Hasan Mushrif's disclosure | शरद पवार यांना सरकारबरोबर येण्याचे घातले साकडे; हसन मुश्रीफ यांचा खुलासा

शरद पवार यांना सरकारबरोबर येण्याचे घातले साकडे; हसन मुश्रीफ यांचा खुलासा

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे एकच कुटुंब आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षही एकच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी याआधीच शरद पवार यांची भेट घेत त्यांनी सरकारबरोबर यावे यासाठी त्यांना साकडे घातले आहे, असा खुलासा राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला.

पुण्यात एका कार्यक्रमानंतर ते माध्यमांशी बाेलत हाेते. अजित पवार मुख्यमंत्री होण्याबाबत आणि जयंत पाटील सरकारमध्ये सहभागी हाेण्याबाबत त्यांना छेडले असता त्याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगत त्यांना प्रश्न टाळला. पुढे म्हणाले की, राज्याच्या विकासासाठी आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो आहोत. ईडी प्रकरणात मला न्यायालयाने दिलासा दिल्याचाही उल्लेख त्यांनी केला.

वैद्यकीय शिक्षण रुग्णालयांतही माेफत उपचार?

आरोग्य विभागाने मोफत सेवा देण्याची घोषणा केली आहे. मात्र, अद्याप वैद्यकीय विभाग आणि महापालिका रुग्णालयाबाबत निर्णय झालेला नाही; परंतु लवकर हा निर्णय अपेक्षित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच ससूनचा अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स) धर्तीवर विकास करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

Web Title: Sharad Pawar asked to come with the government Hasan Mushrif's disclosure